Raigad Pali News: शेतकऱ्यांनी जमीन दान करून उघडला विकासाचा मार्ग; सोसायटी आदिवासीवाडीत २० लाखांचा पक्का रस्ता

सोसायटी आदिवासीवाडीला अखेर पक्का रस्ता; २० लाखांच्या काँक्रीट कामाला सुरुवात, वर्षानुवर्षांचा हालअपेष्टांचा वनवास संपणार
झोळीतून प्रवासाचा वनवास संपला! पालीतील सोसायटी आदिवासीवाडीला मिळाला २० लाखांचा पक्का रस्ता; शेतकऱ्यांनी केले जमिनीचे दान

झोळीतून प्रवासाचा वनवास संपला! पालीतील सोसायटी आदिवासीवाडीला मिळाला २० लाखांचा पक्का रस्ता; शेतकऱ्यांनी केले जमिनीचे दान

Sakal

Updated on

पाली : पाली नगरपंचायत अंतर्गत असलेल्या सोसायटी आदिवासीवाडी** येथील नागरिकांचा अनेक वर्षांचा रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगरसेविका जुईली ठोंबरे व भाजप सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या दुर्गम भागात आता २० लाख रुपये निधीतून काँक्रीटचा पक्का रस्ता साकारत असून, वाडीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

फोटो ओळ, पाली, काँक्रीटचा पक्का रस्ता होतांना सोबत आदिवासी ग्रामस्थ व मान्यवर. (छायाचित्र, अमित गवळे)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com