‘‘गेली १५ वर्षे मी नीलेश राणे यांच्यासोबत काम करीत आहे. शब्द पाळणारा, मैत्रीला जपणारा नेता, तरुणांचा ‘आयडॉल’ असा नेता म्हणून त्यांची ओळख आहे."
सावंतवाडी : आमदार नीलेश राणे (Nilesh Rane) हे सर्वसामान्यांचे नेतृत्व असून, खासदार म्हणून त्यांनी खूप मोठे कार्य केले होते. आमदार म्हणूनही ते अभ्यासपूर्ण काम करत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो व यापुढेही त्यांच्या हातून कोकण विकासाचे कार्य घडो, अशा शब्दांत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आमदार राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.