
Sidhudurg Crime News : चिरेखाणीवर काम करणाऱ्या दोघा परप्रांतीय कामगारांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून डोक्यात ट्रकचे चाक खोलण्यासाठी वापरला जाणारा पाना मारल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. कृष्णकुमार जुगराज यादव (वय २०, रा. मध्य प्रदेश) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १५) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील वरेरी सडा भागातील एका चिरेखाणीजवळ घडली. यातील संशयित रितीक दिनेश यादव (वय २०, रा. मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या अटकेची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. विशेष म्हणजे हे दोघेही नातेवाईक असून किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत हा प्रकार घडला.