चिपी विमानतळावर लँडिंग ट्रायल यशस्वी ; उद्‌घाटनाची तारीख निश्चित

inauguration of chipi airport declared the date in march said vinayak raut in ratnagiri
inauguration of chipi airport declared the date in march said vinayak raut in ratnagiri
Updated on

ओरोस (सिंधुदुर्ग) : चिपी विमानतळावर काल दोन लॅंडिंग ट्रायल झाल्या. दोन्हीही ट्रायल यशस्वी झाल्या. त्यामुळे संबंधित कंपनीने उद्‌घाटनाचा कार्यक्रम १ मार्चला आयोजित केला आहे. खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

'शिवसेना विकासाला पहिली विरोध करते नंतर श्रेय घेते' या नारायण राणेंने केलेल्या आरोपाला उत्तर देताना राऊत म्हणाले, की शिवसेना विकासाच्या कधीच विरोधात नव्हती, मात्र विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या लुबाडणुकीला विरोध करत होती. सी-वर्ल्ड प्रकल्प साडेतीनशे एकर जागेत होत असताना १३०० एकर जागा आरक्षित केली होती. उर्वरित जागेत राणे कुटुंबीय हॉटेल उभारणार होते. त्याचा पोलखोल आमदार वैभव नाईक यांनी त्यावेळी केला होता. 

चिपी विमानतळासाठी लागणाऱ्या जागेच्या व्यतिरिक्त ९३७ हेक्‍टर जागेत कमर्शियल म्हणून पेन्सिल नोंद केली होती. त्यासाठी दादागिरी सुरू होती. त्याला आमचा विरोध होता. ताज हॉटेल नारायण राणे यानी मंजूर केले होते; परंतु त्यावेळी विरोध झाला. आता सर्व्हे नंबर ३९ वगळून गावठान जागेत ताज हॉटेल उभारत आहोत, असेही यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले. 

सूरत-अहमदाबाद वाहतुकीसाठी प्रयत्न 

खासदार राऊत म्हणाले, की संबंधित कंपनीने नुकत्याच चिपी येथे दोन लॅंडिंग ट्रायल घेतल्या. दोन्हीही यशस्वी झाल्या. आता १ मार्चला उद्‌घाटनाचा निर्णय कंपनीने घेतला आहे. चिपीचा समावेश झाल्याने अडीज हजार रुपये तिकीट आहे. मुंबईला येथून येण्यासाठी रोज ११ वाजता विमान सुटेल. दुपारी १ वाजुन ५० मिनिटांनी चिपी येथून मुंबईला जाण्यासाठी रोज विमान सुटणार आहे. सूरत अहमदाबाद सिंधूदुर्ग वाहतूक सुरू करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात अनेक कंपन्या यायला तयार आहेत, असे ते म्हणाले.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com