
सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवतहानी झालेली नाही.
नेर्ले (सांगली) : येथील आशियाई महामार्गावर सलग पाच गाड्यांच्या झालेल्या अपघातामध्ये मोटार कारसह मालगाडीचे लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले. कोल्हापूरहून पुण्याला जाणाऱ्या एम. एच. ५०.६१०८ मालगाडीला, मोटार कार एम. एच. १० डी. एल. ६२२१ अनुक्रमे एम. एच. १२ सी. आर. २९४१, एम. एच. १४ जी. वाय. ५५५८ या गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नेर्ले गावाकडून महामार्गावरून अज्ञात चारचाकी वाहनाने सरळ महामार्गावर प्रवेश केल्यामुळे त्याच्या मागून कोल्हापूरहून येणाऱ्या कार चालकाने गाडीचा वेग कमी करताच, पाठीमागून अतिवेगात येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. यावेळी महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. गस्ती पथकाचे पोलिस शेनेकर व त्यांची टीम ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी महामार्गावरील वाहने मार्गस्थ केली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवतहानी झालेली नाही.
हेही वाचा - आता विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवरही -
संपादन - स्नेहल कदम