esakal | देवरुख आंबवली येथील घटना ; अखेर 2 तासाच्या प्रयत्नाने त्याला मिळाले जीवनदान
sakal

बोलून बातमी शोधा

incident at Devrukh Ambavali 2 hours effort of forest department Surviving a leopard

विहीरच्या खळीत थकून दगडाचा त्याने घेतला आसरा

देवरुख आंबवली येथील घटना ; अखेर 2 तासाच्या प्रयत्नाने त्याला मिळाले जीवनदान

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाने सुरक्षित बाहेर काढले. आंबवली (ता. देवरुख) जेथे ही घटना आज सकाळी घडली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासून बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.


गणपत सूर्याजी पाष्टे (रा. आंबवली पाष्टे वाडी) यांचे घराच्या आवारात दगडी कठडा असलेली विहीर आहे. भक्ष्याचा पाठलाग करताना तो विहीरी पडला होता. विहिरीत बिबट्या पडलेची बातमी संतोष पाले (रा. आंबवली) यांनी फोनद्वारे रत्नागिरी वन विभागाला दिली. आज सकाळी  7.45 वाजता दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा- आयुष्यभर गोपालन करणार्‍या व्यंक्या लांबोरची एक्झिट चटका लावणारी -

बिबट्या विहीरच्या खळीत थकून दगडाचा आसरा घेऊन बसला होता. वन विभागाने पिंजरा विहिरीत सोडला. थकलेल्या बिबट्याने काही वेळात पिंजऱ्याचा आधार घेत आत शिरला आणि पिंजऱ्याचे दार लावण्यात आले. 2 तासानंतर बिबट्याला सुखरूप विहिरीतुन बाहेर काढले. 

हेही वाचा- चिपळूणात कोरोनाग्रस्तांचा एक हजाराचा टप्पा पार ; या वयोगटातील व्यक्तींचा अधिक समावेश -


पशुवैद्यकीय अधिकारी देवरुख यांचेकडून त्याची तपासणी करून सुरक्षितरित्या  त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी र. शी. भवर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनपाल देवरुख  सुरेश उपरे, वनरक्षक न्हानू गावडे, शर्वरी कदम, मिलिंद डाफळे यांनी पार पाडली. याकामी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळाले 
बिबट्या हा  नर असून    य सुमारे 5 वर्षे आल्याचे वन विभागाने सांगितले.


संपादन - अर्चना बनगे

loading image