कोकणात दादर-सावंतवाडी-दादर ही कोव्हिड स्पेशल ट्रेन

राजेश कळंबटे
Friday, 9 October 2020

कोकण रेल्वेकडून दादर-सावंतवाडी-दादर ही कोव्हिड स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली. 

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर सध्या सुरू असलेली दादर सावंतवाडी दादर ही मुंबई- कोकणातील प्रवाशांच्या सुविधेकरीता सुरू असलेली कोव्हिडं स्पेशल ट्रेन आहे. मार्च महिन्यात कोरोनाची तीव्रता वाढू लागल्यानंतर देशभरातील रेल्वे वाहतुकीच्या बरोबरीने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद झाली. मात्र मुंबई आणि कोकणातील लोकांची गैरसोय होऊ नये याकरीता कोकण रेल्वेकडून दादर-सावंतवाडी-दादर ही कोव्हिड स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली. 

हेही वाचा - शिवसेनेच्या आमदारांना नक्की झालय तरी काय ? 

यापूर्वी नियमीत ट्रेन वाहतूक सुरू असताना दादर सावंतवाडी दरम्यान धावणा-या तुतारी एक्स्प्रेस या गाडीचा क्रमांक 11003-11004 असा होता. सध्या सुरू असलेल्या कोव्हिड स्पेशल ट्रेन ही पहिल्या दिवसापासून 01003-01004 कोव्हिड स्पेशल या नावाने सुरू आहे.  नियमित तुतारी ट्रेनचे काही थांबे ही गाडी घेत नाही. ही ट्रेन पूर्णपणे आरक्षित असून या गाडीच्या डब्यांची संख्या आणि प्रकारही वेगळे आहेत.

कोकण रेल्वेच्या मार्गावर सध्या धावत असणारी कोणतीही नियमित ट्रेन नसून या सर्व ट्रेन्स कोव्हिडच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये याकरिता सुरू केलेल्या स्पेशल ट्रेन आहेत. त्या नियमित चालणा-या गाड्यांच्या वेळेत चालतात पण त्यांचे थांबे, स्थान वेगळे असू शकते. तुतारीच नव्हे, तर अन्य नियमित ट्रेन्स देखील जशा चालू होतील, त्या प्रमाणे त्यांच्या नावा नंबरासह त्यांची घोषणा केली जाईल. 

हेही वाचा - रत्नागिरीत दोन दिवसात पाच अवैध हातभट्ट्यांवर छापे 

आज तरी कोकणवासीयांना सोईचा, स्वस्त, जलद व सुरक्षित असा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणे हे कोकण रेल्वे प्रशासनाचे प्राधान्य आहे, व असे करताना उपलब्ध करून दिलेला पर्यायहा महामंडळाचे  आर्थिक नुकसान करणारा नसणे हे देखील आवश्यक आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inconvenience of konkani people dadar sawantwadi dadar is a special covid train in ratnagiri