लोकसभा निवडणूक प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी शिक्षकांची गैरसोय

अमित गवळे 
सोमवार, 15 एप्रिल 2019

पाली - रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणूकांची तयार सुरु आहे. यासाठी लागणा-याकर्मचार्यांना प्रशिक्षण कार्यक्रम देखिल राबविले जात आहेत. मात्र शनिवारी (ता.१३) म्हसळा व महाड येथे आयोजित प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थीची मोठी गैरसोय झाली. इतर तालुक्यातून दुरवरुन आलेल्या मुख्यतः शिक्षकांना जाण्यायेण्याची कोणतीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. याबद्दल अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे सुधागड तालुका अध्यक्ष मोरेश्वर रमाकांत कांबळे यांनी जिल्हाधिकार्यांना विनंत अर्ज केला आहे.

या निवडणूक कामी लागणारे कर्मचारी हे बहुतांशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक वर्ग आहेत. प्रत्यक्ष बुथवर जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार शिक्षक जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र शिक्षकांच्या जीविताची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार होत नाही. शिक्षकांच्या मुख्यालयापासून जवळपास ७०ते 100 किमी अंतरावर काही वेळा प्रशिक्षण आयोजित केले जाते. परंतु तेथे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची वाहनाची सोय केली जात नाही. प्रशिक्षणाची वेळ सकाळी नऊची असते काही ठिकाणी उशिरा प्रशिक्षण चालू होते. काही ठिकाणी 11 ते 12 वाजेपर्यंत साधं पाणी सुद्धा दिले जात नाही त्यासाठी आम्हाला भांडावे लागते असे अनेक शिक्षकांचे म्हणणे आहे. शनिवारी (ता.१३) 193 श्रीवर्धन मतदार संघाचे प्रशिक्षण म्हसळा येथे होते. तेथे शिक्षकांनी बारा वाजता जेव्हा चहापाण्याच्या व्यवस्थेबद्दल विचारले तेव्हा त्यांना एक समोसा दिला गेला. महाड मध्ये सुद्धा चहापाण्याच्या व्यवस्थेबद्दल विचारले तेव्हा प्रांताधिकार्यांनी उत्तर दिले की आम्ही प्रथम प्राधान्य निवडणुकीला देतो. मग आम्हाला फक्त राबवून घेणार आहात काय? असा सवाल शिक्षकांचा आहे. बर्याच प्रशिक्षण केंद्रांवर प्रशिक्षणकर्त्यांसाठी पुरेशा प्रमाणता चहापाण्याची व्यवस्था देखिल केली जात नाही. मोठ्या संख्येने आलेल्या प्रशिक्षणार्थींना अवघे काही जार पाणी आणले जाते. त्यामुळे प्रशिक्षणार्थींची साध्या पाण्यासाठी देखिल गैरसोय होते.

निवडणूकीच्या आदल्या दिवशी संबधित मतदार संघात जाण्यासाठी व पुन्हा मुख्यालयात आणण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती पाली-सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णवार यांनी सकाळला दिली.

प्रशिक्षण केंद्रावर चहा-पाण्याची निट व्यवस्था करण्यात यावी. तसेच शिक्षकांना 22 तारखेला सकाळी नियोजित मतदार संघात नेण्यासाठी व पुन्हा मुख्यालयी सोडण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात यावी ही विनंती.
- मोरेश्वर रमाकांत कांबळे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inconvenience of trainee teachers in Lok Sabha election training