'माणुसकी गेली संपावर, अच्छे दिन पेट्रोल पंपावर'

कॅमेरासमोर येऊन वायफळ बडबड करण्यापेक्षा गोरगरीब कष्टकरी जनतेला दिलासा देण्याची खरी गरज आहे.
'माणुसकी गेली संपावर, अच्छे दिन पेट्रोल पंपावर'
Updated on: 
Summary

कॅमेरासमोर येऊन वायफळ बडबड करण्यापेक्षा गोरगरीब कष्टकरी जनतेला दिलासा देण्याची खरी गरज आहे.

कुडाळ : ‘माणुसकी गेली संपावर, अच्छे दिन पहा पेट्रोल पंपावर’, अशी परिस्थिती सध्या आली आहे. पेट्रोल ११४ रुपये, डिझेल १०३ रुपये तर घरगुती गॅस ९१३ एवढा इंधन दरवाढीचा उच्चांक वाढत आहे. त्यामुळे जनतेने देखील हताश होऊन दिवस मोजण्यापेक्षा उठाव करण्याची खरी गरज आहे तरच परिस्थितीत सुधारणा घडू शकेल, अन्यथा हे पक्ष दखलही घेणार नाहीत, अशी टीका येथील मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली आहे.

'माणुसकी गेली संपावर, अच्छे दिन पेट्रोल पंपावर'
'नका करू तोंडाची वाफ, नाहीतर...'; राणेंचा महाविकास आघाडीवर घणाघात

गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, इंधन पुरवठ्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य अक्षरशः वसुली केंद्र चालवत आहेत. एकीकडे पेट्रोलचे दर ११४.३४ रुपये, डिझेल १०२.८४, घरगुती गॅस ९१३ अशी भरमसाठ इंधन दरवाढ होऊन महागाईने उच्चांक गाठला आहे; मात्र दुसरीकडे केंद्रातील भाजप व राज्यातील आघाडीतील घटक सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्ष एकमेकांविरोधात बोट दाखवून जबाबदारीतून पळ काढत आहेत.

कोविड आपत्तीनंतर वाढलेली बेरोजगारी व त्यात उत्तुंग शिखरावर पोहचलेली महागाई, अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस जगण्यासाठी संघर्ष करतोय; मात्र केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षांना त्याचं सोयर सूतक उरलेले नाही. कॅमेरासमोर येऊन वायफळ बडबड करण्यापेक्षा गोरगरीब कष्टकरी जनतेला दिलासा देण्याची खरी गरज आहे. परदेशात पेट्रोल वाढ झाली तर जनता रस्त्यावर गाड्या लावून सरकार विरोधात निषेध नोंदवते मग आपल्याकडे उद्रेक दिसणार तरी कधी? जनतेने देखील हताश होऊन दिवस मोजण्यापेक्षा उठाव करण्याची खरी गरज आहे तरच परिस्थितीत सुधारणा घडू शकेल, अन्यथा गेंड्याची कातडी पांघरून सत्तेत बसलेले हे मुजोर पक्ष दखलही घेणार नाही, असे पत्रकात नमूद आहे.

'माणुसकी गेली संपावर, अच्छे दिन पेट्रोल पंपावर'
ठरलं! राष्ट्रवादीला 11, कॉंग्रेस 7 तर शिवसेनेला मिळणार फक्त दोनच जागा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com