'2023 मध्ये भारत होणार हिंदू राष्ट्र'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

रत्नागिरी : भारताच्या राज्य घटनेत डॉ. आंबेडकरांनी धर्मनिरपेक्ष असा उल्लेख केला नाही. मात्र या घटनेत दुरुस्ती करून हिंदू राष्ट्राला निधर्मी राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न झाला. मात्र हिंदू धर्मावरील सर्व संकटे दूर होऊन सनातन संस्कृती टिकून राहिली. आता 2023 मध्ये हिंदू राष्ट्र म्हणून भारताची ओळख साऱ्या जगाला होणार आहे. यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी केले. 

हिंदू जनजागृती समिती व सनातन संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी स्टेडियमवर दोन हजार हिंदुंच्या उपस्थितीत हिंदू राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. ते म्हणाले , संघर्ष केल्याशिवाय हिंदू राष्ट्र होणे शक्‍य नाही. पहिले पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल झाले असते तर केव्हाच हिंदू राष्ट्र झाले असते. नेहरुंच्या निर्णयांची शिक्षा आपण भोगतोय. आज मोदींच्या रूपाने चांगले पंतप्रधान लाभले आहेत. सनातन संस्थेवर बंदी म्हणजे धर्म, हिंदू संस्कृतीवर बंदी. आज हिंदुंवर पुरोगामी लोक वाट्टेल ते बोलत आहेत. हिंदू शांत असल्याने त्यांची चेष्टा होते. मात्र इतरांची, त्यांच्या धर्मग्रंथांची चेष्टा करून बघा. ही हिमंत पुरोगाम्यांमध्ये नाही. काश्‍मिरमधील हिंदुंना विस्थापित व्हावे लागले, दीड लाख सिंधी लोकांनी धर्मांतर केले, यावर पुरोगामी का लिहत नाहीत, असा सवालही मुतालिक यांनी केला. 

कॉंग्रेसवर बंदी घाला 
भ्रष्टाचारी, देशद्रोही आणि सीमांचे संरक्षण करणाऱ्या सैनिक, जवान, पोलिसांवर वाट्टेल ते आरोप करणाऱ्या कॉंग्रेसवर बंदी घाला आणि मगच सनातनवर बंदीची भाषा करा, असा सज्जड इशारा सनातनच्या स्वाती खाड्ये यांनी दिला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India will be Hindu nation in 2023 says Pramod Mutalik