esakal | देवगडात 5 मार्चपासून भारतीय चित्रपट महोत्सव : दिग्दर्शक राजदत्त आणि ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांना जीवन गौरव पुरस्कार...

बोलून बातमी शोधा

Indian Film Festival from 5 March in Devgad kokan marathi news

स्थनिक पर्यटन वाढीसाठी 5 ते 8 मार्च या कालावधीमध्ये येथे ‘सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टीव्हल’आयोजित करण्यात येणार आहे.

देवगडात 5 मार्चपासून भारतीय चित्रपट महोत्सव : दिग्दर्शक राजदत्त आणि ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांना जीवन गौरव पुरस्कार...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवगड (सिंधुदूर्ग) : स्थनिक पर्यटन वाढीसाठी 5 ते 8 मार्च या कालावधीमध्ये येथे ‘सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टीव्हल’ (एसएनएफएफ) आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांना ‘एसएनएफएफ जीवन गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त, उल्लेखनीय लघूपट महोत्सवात पहायला मिळणार असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी येथे पत्रकारांना दिली. 

हेही वाचा- शेतकऱ्यांचे लढवय्ये पुष्पसेन सावंत यांचे निधन...

महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष
यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, नगराध्यक्षा प्रणाली माने, बाळ खडपे, अभिनेता अनिल गवस, स्नेहल शिदम उपस्थित होते. महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. येथील कंटेनर थिएटरमध्ये महोत्सव होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने तरुण दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कला आणि संस्कृती’ तसेच ‘पर्यटन’ विषयावर लघूचित्रपट किंवा माहितीपट बनवायचा असून याचे चित्रीकरण देवगडमध्येच करायचे आहे.

हेही वाचा- सिंधुदूर्गात सर्जेकोट गावाने आणला नवा पॅटर्न... कसा तो वाचा..

विविध विषयांवर चर्चासत्र

‘विद्यार्थ्यांनी चित्रपट कसा पहावा, चित्रपट सृष्टीतील स्त्रियांचा सहभाग, चित्रपटांमुळे संस्कृती आणि पर्यटन क्षेत्राला मिळालेले प्रोत्साहन’ आदी विषयांवर चर्चासत्र घेतली जाणार आहेत. महोत्सवात सिंधुदुर्गातील दशावतार कला सादर करण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे राणे यांनी सांगितले. महोत्सव दिग्दर्शक सुमित पाटील यांनी महोत्सवाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी अनिल गवस आणि स्नेहल शिदम यांनी मनोगत व्यक्त केले.