esakal | शेतकऱ्यांचे लढवय्ये पुष्पसेन सावंत यांचे निधन...
sakal

बोलून बातमी शोधा

 farmers fighter pushpasin sawant died in sindudurg kokan marathi news

शेतकऱ्यांचे लढवय्ये नेतृत्व, अन्यायाविरुद्ध सातत्याने आक्रमक आवाज उठविणारे माजी आमदार पुष्पसेन सावंत (वय ७९) यांचे आज सायंकाळी येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले.

शेतकऱ्यांचे लढवय्ये पुष्पसेन सावंत यांचे निधन...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदूर्ग)  : शेतकऱ्यांचे लढवय्ये नेतृत्व, अन्यायाविरुद्ध सातत्याने आक्रमक आवाज उठविणारे माजी आमदार पुष्पसेन सावंत (वय ७९) यांचे आज सायंकाळी येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. ट्रक ड्रायव्हर ते आमदार अशी त्यांची वाटचाल निश्‍चितच थक्क करणारी म्हणावी लागेल. 
उद्या (ता. २२) सकाळी साडेआठ वाजता हुमरमळा येथील डी फार्मच्या प्रांगणात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य आशा सावंत, मुलगे पावशी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, भूपतसेन सावंत असा परिवार आहे.
डिगस आवळे गावचे सुपुत्र 

पुष्पसेन यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद सदस्यत्वापासून सुरू झाला. त्यानंतर ते सलग दोनदा आमदार म्हणून निवडून आले. तिसऱ्या वेळी शिवसेनेचे माजी आमदार शंकर कांबळी यांच्याविरुद्ध त्यांचा पराभव झाला होता. जनता दल पक्षाक्षी असणारी विचारसरणी त्यांनी कायमस्वरूपी ठेवली गेली. कित्येक वर्षे जनता दलाचे सक्रिय पदाधिकारी, नेते म्हणून कार्यरत होते. माजी अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांची विचारसरणी त्यांनी राबविली. माजी आमदार बाली किंनळेकर यांनी त्यांना पहिली विधानसभा निवडणूक लढविण्यास प्रवृत्त केले.

हेही वाचा - रत्नागिरीत मोबाईल विक्रेत्यावर अचानक झाला गोळीबार अन....

ट्रक ड्रायव्हर ते आमदार असा  प्रवास

विशेष म्हणजे एक ट्रक ड्रायव्हर ते आमदार असा त्यांचा प्रवास निश्‍चितच सर्वांना थक्क करणारा होता. अन्यायाविरुद्ध लढणारे आणि सडेतोड असे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आजअखेरपर्यत कायम होती. शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध सातत्याने लढा देणारे नेतृत्व होते. विशेष म्हणजे ते स्वतः एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावाजले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत शेती क्षेत्रात विविध आमूलाग्र बदल केले. शेतीला प्राधान्य देत त्यांनी ग्रामीण भागात विशेष विकासात्मक दृष्टीने पावले टाकली. त्यांनी शेतीसंदर्भात आणि अन्य सामाजिक प्रश्‍नांबाबत केलेली विविध आंदोलने लक्षवेधी होती.

हेही वाचा -  विसरलेले लायसन्स मिळाले फेसबुकमुळे, कसे ?

‘पुष्या’ या नावाने ते विधानसभेत परिचित
पुष्पसेन सावंत सलग दोन वेळा आमदार असल्यामुळेच विधानसभेतील ओळख सिंधुदुर्गवासीयांनी अनुभवली आहे. ‘पुष्या’ या नावाने ते विधानसभेत सर्वत्र परिचित होते. जनता दल पक्षाचे अस्तित्व संपल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस संघटना वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना या पक्षाला काही कारणास्तव राम राम ठोकला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेततृत्वाखाली या पक्षात प्रवेश केला. बरीच वर्षे ते नेते म्हणून या पक्षात कार्यरत होते. काही राजकीय घडामोडीमुळे पुन्हा ते काँग्रेसमध्ये राहिले. शरद पवार यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती.

हेही वाचा -  ...त्यामुळे झालीय शिवसेनेची कोंडी

कृषी क्षेत्रात योगदान

त्यांनी शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देताना कृषी क्षेत्रात फार मोठे योगदान दिले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत डी फार्मसीबरोबरच शैक्षणिक संस्था सुरू केल्या. विविध क्षेत्रांतील माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी शैक्षणिक संस्था सुरू केल्या.गेले काही दिवस ते आजारी होते; मात्र आजारी असतानासुद्धा ते घरी थांबले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी ते ओरोस कृषीभवन येथे आले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना पुष्पसेन सावंत अशी हाक देत त्यावेळी बोलावले होते. आज ते कणकवली येथून घरी येत असताना अचानक छातीत दुखू लागले. त्यांना तत्काळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले.