अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिराची माहिती मिळणार एका क्लिकवर | Website | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिराची माहिती मिळणार एका क्लिकवर
अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिराची माहिती मिळणार एका क्लिकवर

अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिराची माहिती मिळणार एका क्लिकवर

sakal_logo
By
अमित गवळे

पाली - पालीतील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिराची व देवस्थान ट्रस्टच्या उपक्रमांची इतंभूत माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. मंगळवारी (ता. 23) सायंकाळी अंगारकी चतुर्थीला प्रसिद्ध शास्त्रज्ञ श्रीराम सबनीस यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. येथील भक्तनिवास क्रमांक 1 मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

ही वेबसाईट सुबोध वझे यांनी तयार केली आहे. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. सुधीर पुराणिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. धनंजय धारप म्हणाले की बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत ट्रस्टच्या माध्यमातून असंख्य लोकाभिमुख, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत.

हेही वाचा: अवकाळीचा कहर; समुद्रातही वादळ

गरजू लोकांना, रुग्णांना व विद्यार्थ्यांना वस्तू, धान्य, सेवा व आर्थिक स्वरूपात मदत केली जात आहे. कोविडच्या संकटात देखील मदतीचा ओघ कायम सुरू आहे. ही सर्व माहीत या वेबसाईटच्या माध्यमातून दाते व लोकांपर्यंत पोहोचेल तसेच आगामी उपक्रम देखील लोकांना कळतील. असे देखील धारप म्हणाले.

या कार्यक्रमास शास्त्रज्ञ श्रीराम सबनीस, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. धनंजय धारप, उपाध्यक्ष विनय मराठे, विश्वस्त माधव साने, उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहूल मराठे, प्राचार्या डॉ. अंजली पुराणीक, प्रा. सुधीर पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन धनंजय गद्रे यांनी केले. कार्यक्रमासाठी सौरभ मराठे या तरुणाने मेहनत घेतली.

loading image
go to top