हसोळतर्फे सौंदळ ग्रामसेवकाची चौकशी करा

हसोळतर्फे सौंदळ ग्रामसेवकाची चौकशी करा

सरपंच, ग्रामसेवकाची चौकशी करा’

आमदार साळवी ः ग्रामपंचायत हसोळतर्फे सौंदळ
सकाळ वृत्तसेवा ः
राजापूर, ता. १ ः तालुक्यातील जांभवली ग्रामस्थांच्यावतीने शिवसेनेचे शाखाप्रमुख दीपक पोटले यांनी ग्रामपंचायत हसोळतर्फ सौंदळ सरपंच व ग्रामसेवक यांनी विकासकामांमध्ये केलेल्या गैरव्यवहाराबाबतच्या आरोपांची आमदार राजन साळवी यांनी दखल घेतली. या गैरव्यवहारप्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांची विभागनिहाय चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार साळवी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत हसोळतर्फ सौंदळ कार्यक्षेत्रातील जांभवली घाडीवाडी गणेशघाट बांधकाम करणे हे काम पूर्ण झाल्याचे दाखवून सरपंच व ग्रामसेवक यांनी ठेकेदाराच्या नावे बिलापोटी ९४ हजार रुपये अदा केले. प्रत्यक्षात काम झालेले नाही. ही बाब जांभवली ग्रामस्थांच्यावतीने शिवसेनेचे शाखाप्रमुख पोटले यांनी आमदार साळवी यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार साळवी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्‍यांना निवेदन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com