राज्यातील पहिलाच अभिनव उपक्रम - हे मंत्री देणार स्वखर्चाने सरपंचांना विमा संरक्षण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

जिल्हयात सरपंचांना विम्याचे संरक्षण...स्वखर्चाने देणारे राज्यातील पहिले मंत्री...

रत्नागिरी : जिल्हयात कोव्हीड  19 चा मुकाबला करण्यात ग्रामस्तरावरील सरपंचांचा मोलाचा वाटा आहे. या सरपंचांना स्वखर्चाने विम्याचे संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. विमासंरक्षण देण्यात येणार आहे. राज्याचा अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. या तीन महिन्यांपुरता तो मार्यादित नसून वर्षभर विम्याचे कवच राहणार आहे. विशेष म्हणजे त्यानंतर अपघाती विम्यामध्ये त्याचे रुपांतर होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मोठया प्रमाणावर चाकरमानी जिल्हयात दाखल झाले आहेत. या सर्वाना होम क्वांरटाईन करण्यात आलेले आहे. या सर्वांची काळजी ग्रामस्तरावर ग्राम कृती दलावर आहे. या कोरोना विरुध्दच्या लढयात सरपंचांची कामगिरी अतिशय मोलाची आहे. याच जाणिवेतून या सर्वांना आपण स्वखर्चाने विमा संरक्षण देणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. सरपंच हे ग्रामीण भागातील गावचे प्रथम नागरिक आहेत. गावातील बारीक-सारीख हालचालीवर त्यांचे लक्ष असते. ग्राम कृती दलामध्ये त्यांची महत्त्वाची भुमिका आहे. गावात येणार्‍या चाकरमान्यांबाबत ते आरोग्य विभागाला माहिती देऊन संबधितांमध्ये लक्षणं दिसल्यास त्यांची स्वॅब घेणे, त्यांना क्वारंटाईन किंवा होम क्वारंटाईन करण्यापर्यंत तसेच सुविधा पुरविण्यापर्यंत त्यांच्यावर जबाबदारी पडते.

हेही वाचा- कोल्हापुरात आणखी 4 जणांना कोरोनाची लागण... -

ग्रामीण भागातील या कोविड योद्धाला कोणतेही संरक्षण नाही. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वखर्चातून सरपंचाचा विमा देणारे उदय सामंत हे राज्यातील पहिले मंत्री आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insurance protection to sarpanches provided by uday samant in ratnagiri