कोल्हापुरात आणखी 4 जणांना कोरोनाची लागण...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

जिल्हा कोरोनामुक्त होणार म्हणत आनंद व्यक्त करणाऱ्या कोल्हापूरकरांच्या मनात कोरोनाची धडकी भरली आहे. 

कोल्हापूर - नुकत्याच हाती आलेलेल्या अहवालानुसार 4 जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आहेत. या रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 186 वर पोहोचली आहे. हे चार ही रुग्ण भुदरगडचे आहेत.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रोजच रूग्णांच्या संखेत वाढ होत असल्याने जिल्हा कोरोनामुक्त होणार म्हणत आनंद व्यक्त करणाऱ्या कोल्हापूरकरांच्या मनात कोरोनाची धडकी भरली आहे. 

हे पण वाचा -  तो कर्नाटकातला, ती महाराष्ट्रातली, लग्न करुन त्यांनी संसार थाटला पण...

बाहेरून येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळ लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोल्हापूरवासियांचे ग्रीन झोनचे स्वप्न भंगले आहे. मुंबई व्यतिरिक्त सातारा, दिल्ली, सोलापूर, राजस्थानमधून आलेल्या लोकांमुळे कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्येत भर पडत आहे.

हे पण वाचा -  क्वारंटाइनसाठी स्वत:चे घर देणारे देशातील हे आहेत पहिले खासदार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four corona patient found in kolhapur district