
चिपळूण : कुटुंब वाढले की, वाद वाढतात, प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा वाढते, हाच अनुभव सत्ताधारी शिवसेना-भाजपमधील पदाधिकाऱ्यांना येऊ लागला आहे. पक्षातील पदांचे वाटप असो किंवा निधीचा वाटप असो यावरून महायुतीमध्ये संघर्ष पेटू लागला आहे. त्याचे पडसाद खासदार नारायण राणेंच्या दौऱ्यातून उमटले आणि महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नाही, असा संदेश राजकीय क्षेत्रात गेला आहे.