जनावरांवर उपचारासाठी त्या कधी गाडी घेऊन तर कधी जंगलातून पायीही जात होत्या. त्यांचे हे धाडस पाहून शेतकरी कौतुक करत होते.
दापोली : हरियाणात जन्मलेल्या; पण विवाहानंतर कोकणातील मिनी महाबळेश्वर (Mahabaleshwar) म्हणून ओळख असलेल्या दापोलीत स्थिरावलेल्या डॉ. रेणू लोंढे यांचा पशुवैद्यकीय अधिकारी पदावरील प्रवास तसा खडतरच. त्या दापोली तालुक्यातील मुक्या प्राण्यांसाठी जणू देवदूतच आहेत. मुक्या प्राण्यांची सेवा करताना त्यांना अनेक प्रसंगाना तोंड द्यावे लागले तरीही त्या डगमगल्या नाहीत. वन्य प्राण्यांसह पाळीव प्राण्यावर उपचार करण्याचा त्यांनी वसाच जोपासला आहे.