कणकवलीतून आंतरराज्य एसटी वाहतूक आजपासून सुरू 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

जिल्ह्यातील पाच एसटी आगारातून या आंतरराज्य बससेवा सुरू होत आहेत. यात सावंतवाडी ते बेळगाव, मालवण ते बेळगाव, देवगड ते बेळगाव, कुडाळ ते विजापुर आणि वेंगुर्ला ते वास्को या गाड्यांचा समावेश आहे.

कणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करून ही प्रवासी वाहतूक केली जाईल, असे एसटी विभागाने कळविले आहे. 

जिल्ह्यातील पाच एसटी आगारातून या आंतरराज्य बससेवा सुरू होत आहेत. यात सावंतवाडी ते बेळगाव, मालवण ते बेळगाव, देवगड ते बेळगाव, कुडाळ ते विजापुर आणि वेंगुर्ला ते वास्को या गाड्यांचा समावेश आहे. उद्या सकाळपासून या बस सेवा सुरू होत आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी केले आहे. 

वेंगुर्ला ते वास्को ही गाडी उद्या सकाळी सहा वाजता सुटून वास्को येथे सकाळी 9.20 वाजता पोहचेल. परतीसाठी वास्को बसस्थानकातून सकाळी 9:30 वाजता सुटून दुपारी 12.50 वेंगुर्ला येथे पोहचेल. याच प्रमाणे सावंतवाडी ते बेळगाव ही सकाळी 8 वाजता सुटेल. मालवण बेळगाव ही गाडी पहाटे 4.50 वाजता सुटेल. देवगड ते बेळगाव सकाळी 7.15 वाजता सुटेल तर कुडाळ विजापुर ही गाडी सकाळी 6.30 वाजता सुटणार आहे ही गाडी गगनबावडा मार्गे धावणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interstate ST Transport From Kankavali Starts From Today