
पाली : सुधागड तालुक्यातील गोमाशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 15 व्या वित्त आयोग निधीचा वापर प्राथमिक शाळा गोमाशी येथे शौचालय दुरुस्ती आणि संरक्षण भिंत बांधणे यासाठी करण्यात आला. मात्र ही कामे आराखड्या नुसार झाली नसून कामे पूर्ण होण्याआधीच त्याची बिले देखील मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते व ग्रामस्थ भूषण सुतार यांनी गुरुवारी (ता.17) गटविकास अधिकारी सुधागड यांना लेखी निवेदन देऊन संबंधित ठेकेदार, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व विभागीय अभियंता यांच्यावर कारवाईची मागणी केली.