esakal | मुंबई - गोवा महामार्ग चाैपदरीकरणाला कधी गती मिळणार ? 
sakal

बोलून बातमी शोधा

Issue Of Four Track Work Of Mumbai Goa Highway

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या महत्वाकांक्षी योजनेमुळे इंदापूर ते झाराप या 366.17 कि. मी लांबीच्या मार्गावर 11,475 कोटी रक्कम खर्च होणार आहे.

मुंबई - गोवा महामार्ग चाैपदरीकरणाला कधी गती मिळणार ? 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जानेवारी 2018 मध्ये सुरू झाल्यानंतर कोकणवासियांच्या आशा - आकांक्षा पल्लवीत झाल्या. परंतु सध्या कामात अपेक्षित गती नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे महामार्गाला विलंब होत आहे. मार्च 2020 अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र महामार्ग केव्हा पूर्ण होणार हाच कोकणवासीयांसमोर यक्षप्रश्‍न असल्याचे प्रतिपादन ऍड. विलास पाटणे यांनी केले. 

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या महत्वाकांक्षी योजनेमुळे इंदापूर ते झाराप या 366.17 कि. मी लांबीच्या मार्गावर 11,475 कोटी रक्कम खर्च होणार आहे. पावसाळ्यात महामार्गावर अडचणींचे स्वरूप गंभीर झाले. खड्डे व चिखलामुळे प्रवाशांचे हाल झाले. पावसाळ्यानंतर माल वाहतुकीमुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरल्याने रस्त्याची दुरवस्था झाली होती.

ऍड. पाटणे यांनी महामार्गासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या शतकात रत्नागिरीहून मुंबईला जाण्यासाठी 40 तासांचा प्रवास करून कोल्हापूर मार्गे जावे लागत असे. पनवेल- इंदापूर या 84.66 किमी लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्णत्वाला गेले आहे. सर्व मार्गाचे 10 विभाग करून एकाचवेळी वेगाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले. 

परशुराम ते आरवली या 34 किमी रस्त्यापैकी 20 किमी रस्ता अपूर्ण आहे. परंतु या टप्प्यात काम वेगाने सुरू आहे. सिंधुदुर्गमधील बहुतांशी काम समाधानकारक आहे. जानवली पूल सुरू झाला असून कणकवली उड्डाण पूल दोन महिन्यांत पूर्णत्वास जाईल. रायगडमधील परिस्थिती समाधानकारक नाही. काम वेगाने व्हायचे असेल तर ठेकेदार बदलून किंवा त्यांच्याकडून नियोजनबद्ध, नेटाने काम करून घ्यावे लागेल, असेही पाटणे म्हणाले. 

कशेडीतील बोगद्याचे काम वेगाने 
कशेडीच्या टनेलचे काम रिलायन्स कंपनीमार्फत सुरू आहे. 1.80 किमी लांबीच्या तीन पदरी दोन टनेलमुळे 40 मिनिटांचे अंतर केवळ 9 मिनिटात पार करता येईल. टनेलचे 1/2 किमी काम पूर्ण झाले आहे. बहादूरशेख, युनायटेड स्कूलपर्यंत लांजा, पाली, तरळा, कणकवली आदी ठिकाणी उड्डाणपूल आहेत. भरणानाका, सावर्डा, हातखंबा येथे व्हीयूपी भराव टाकून बायपास नियोजित आहे. संगमेश्‍वरमध्ये बाजारपेठेला धक्का न लावता रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल. 
 

loading image