महामार्गचाैपदरीकरण : पाली बाजारपेठ उद्‌ध्वस्त 

राजेश शेळके
शनिवार, 18 मे 2019

रत्नागिरी - पाली बाजारपेठेची अमृत महोत्सव साजरी करण्याची गौरवशाली वेळ महामार्गाच्या रुंदीकरणात मातीमोल झाली. चौपदरीकरणाच्या कामात पाली बाजारपेठ उद्‌ध्वस्त झाली. बाजार ही पहिली संकल्पना 1954 दरम्यान या गावात राबविण्यात आल्याचा दावा तेथील व्यापाऱ्यांनी केला.

रत्नागिरी - पाली बाजारपेठेची अमृत महोत्सव साजरी करण्याची गौरवशाली वेळ महामार्गाच्या रुंदीकरणात मातीमोल झाली. चौपदरीकरणाच्या कामात पाली बाजारपेठ उद्‌ध्वस्त झाली. बाजार ही पहिली संकल्पना 1954 दरम्यान या गावात राबविण्यात आल्याचा दावा तेथील व्यापाऱ्यांनी केला.

बाजारपेठ वाचविण्यासाठी बायपास काढण्यात येणार होता; मात्र त्याला विरोध झाल्यामुळे बाजारपेठ उद्‌ध्वस्त करून मार्ग करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या 10 टक्के व्यापार पूर्णतः थांबला, 25 टक्के ग्राहकांवर परिणाम झाला. नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारती अनधिकृत ठरविल्या जात आहेत. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठच अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात आहे. 

महामार्ग चौपदरीकरणात या मार्गावर तालुक्‍यात एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे हातखंबा येथील शाळा आणि मंदिर शासनाने वाचवले. तेथे पूल प्रस्तावित आहे. हातखंबा येथील शाळा ते दर्गा असा शाळा आणि मंदिराच्या बाजूने हा पूल बांधण्यात येणार आहे; मात्र त्यामुळे जुना रस्ता आणि या मार्गावरील बाजारपेठ दुर्लक्षित होऊन स्थानिक व्यावसायिक, व्यापारी आदींना मोठा फटका बसणार आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग शहर आणि बाजारपेठेतून जाताना अनेक प्रश्‍न पेरून जात असल्याचे नागरिकांशी संवाद साधल्यानंतर दिसून येते. तालुक्‍यात सर्वांत मंद गतीने ज्या भागात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, तो भाग रत्नागिरी तालुक्‍यात येतो. निवळीपासून पुढे हातखंबा टॅबपर्यंत कामच झालेले दिसत नाही. त्याच्यापुढे झरेवाडीपासून ते पालीपर्यंत आणि पालीपासून लांज्यापर्यंत जोरदार काम सुरू आहे. हातखंबा गावात उतरताना अवघड वळण आणि पुढे चढ आहे. महामार्गात याला फाटा देण्यासाठी देसाई हायस्कूल ते हातखंबा दर्गापर्यंत पूल बांधण्यात येणार आहे. मंदिर आणि प्राथमिक शाळेच्या बाजूने पूल काढण्यात आला आहे. 

पुढे पालीपर्यंत रुंदीकरणाचे जोरदार काम सुरू आहे. यामध्ये पाली बाजारपेठ तर पूर्ण उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला. तेव्हा त्यांनी बाजारपेठेबद्दल असलेली आस्था, भावना, अडचणी व्यक्त केल्या. 

तर रस्ता ओलांडणे अवघड 
मुंबई-गोवा बरोबर मिऱ्या-नागपूर महामार्गाचेही फ्लायओव्हर झाल्यावर बाजारपेठेवर परिणाम होणार. पूल झाला तर सर्वांना अंतर्गत रस्ता ओलांडणे कठीण होणार आहे. पूर्वीचा व्यवसाय आणि आताचा खूप फरक पडला आहे. 25 टक्के व्यवसाय घटला आहे. 10 टक्के व्यवसाय थांबला आहे. जागेचा अभाव, कायदेशीर मान्यता नाही, व्यवसाय नुकसानभरपाई दिलेली नाही. पाऊस पडला तर लांजा, राजापूरप्रमाणे चिखल होणार आहे. रस्ता ओलांडण्याचा गंभीर प्रश्‍न असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. 

शासनाकडून चांगला मोबदला मिळाला. नुकसान झाले नसले, तरी पूर्वीप्रमाणे व्यवसाय राहिला नाही. बिगरशेती जागेत मागे सरकून इमारत उभ्या केल्या. परंतु त्यांना परवानग्या मिळत नाहीत. ग्रामपंचायत त्यांना तत्त्वतः मान्यता देते. ऍसेसमेंटवर अनधिकृत बांधकाम म्हणून जादा कर आकारते. त्यामुळे व्यापाऱ्याचे कंबरडे मोडले आहे. 
- प्रसन्न पाखरे,
व्यावसायिक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Mumbai Goa Highway four track Ground report