esakal | रत्नागिरीतील आयटी इंजिनिअर कश्‍मिरा साकारते गणेशमूर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीतील आयटी इंजिनिअर कश्‍मिरा साकारते गणेशमूर्ती

रत्नागिरी - गणेशमूर्ती बनवण्यात पुरुषांची मक्तेदारी आहे. मात्र, या क्षेत्रात आयटी इंजिनिअर कश्‍मिरा अजित सावंत हिने मूर्तिकलेचे धडे गिरवत गेल्या तीन वर्षांपासून 60 हून अधिक गणपती शाडू मातीपासून साकारल्या आहेत. एक ते साडेचार फुटांपर्यंतच्या मूर्ती तिने बनवल्या असून या मूर्ती मुंबई, पुणे, कर्नाटकात जाणार आहेत.

रत्नागिरीतील आयटी इंजिनिअर कश्‍मिरा साकारते गणेशमूर्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - गणेशमूर्ती बनवण्यात पुरुषांची मक्तेदारी आहे. मात्र, या क्षेत्रात आयटी इंजिनिअर कश्‍मिरा अजित सावंत हिने मूर्तिकलेचे धडे गिरवत गेल्या तीन वर्षांपासून 60 हून अधिक गणपती शाडू मातीपासून साकारल्या आहेत. एक ते साडेचार फुटांपर्यंतच्या मूर्ती तिने बनवल्या असून या मूर्ती मुंबई, पुणे, कर्नाटकात जाणार आहेत. या मूर्तीवरील दागिन्यांची कलाकुसर पाहून सारे खूष होतात. तिची ही कला या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. 

कश्‍मिराच्या आराध्य कलाकेंद्रात सध्या गणेशमूर्ती कामाची लगबग आहे. ती अतिशय सुबक व देखण्या मूर्ती साकारते. गणेशमूर्तीवर अत्यंत सराईत पद्धतीने हात फिरवणारी कश्‍मिरा आयटी इंजिनिअर असून तिने तरुणींच्या पुढे नवा आदर्श ठेवला आहे. कश्‍मिरा गेल्या तीन वर्षांपासून सुबक गणेशमूर्ती बनवते. लहानपणापासून गणपतीच्या मूर्तीच्या कुतूहलामुळे कश्‍मिरा याकडे वळली. आयटी इंजिनिअर पूर्ण करून देखील मूर्ती घडवण्याचे काम करतेय. मेहनत व जिद्दीच्या जोरावर कश्‍मिराने 60 हून अधिक गणपती मूर्ती साकारल्या आहेत. आयटी इंजिनिअर असल्याने मोठी नोकरी न करता मूर्ती साकारण्यात कश्‍मिरा उतरल्याने आई-वडिलांनीही तिला प्रोत्साहन व पाठबळ दिले. 

""माणसाचं शरीर व हत्तीचे मुख हे डिझाईन कसे तयार झाले, याचे लहानपणापासून कुतूहल वाटायचे. गणेशमूर्ती पाहिली की, रेखीव काम व जिवंतपणा जाणवतो. आता याचे हळूहळू उत्तर मिळते आहे. तीन वर्षांपूर्वी छोटी मूर्ती बनवली. त्यात भरपूर चुका होत्या. मग शहरातील चित्रशाळांमध्ये फिरले व चुका सुधारल्या. गतवर्षी मित्रमैत्रिणींनी मूर्ती बनवायला सांगितल्या. त्या चांगल्या झाल्याने यावर्षी त्यांनी पुन्हा मागणी नोंदवली.'' 
- कश्‍मिरा सावंत 

दागिने बनवण्यात हातखंडा 
बाप्पाला लागणारे दागिने साकारण्यात कश्‍मिराची खासीयत आहे. गळ्यातील हार, मुकुटावरचे विविध हार, बाजूबंद, कमरपट्टा, अंगठी, पैंजण किंवा सोंडेवरचे दागिने घडवण्यात कश्‍मिराचा हातखंडा आहे. पेशवाई राज, टिटवाळा गणपती, बाळ गणपती व मयूरासनावरचा गणपती आदी विविध प्रकारचे बाप्पा तिने साकारले आहेत. 

loading image
go to top