नोकरीच्या हमखास संधीमुळे व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल

ITI education students admission increased for this field in ratnagiri
ITI education students admission increased for this field in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : कोरोनामुळे तीन महिने लांबणीवर पडलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची हमखास संधी असल्याने विद्यार्थ्यांचा याकडे कल वाढला आहे.

जिल्ह्यात एकूण 10 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत 1 हजार 200 एवढी प्रवेश क्षमता आहे; मात्र या जागांसाठी आता 2 हजार 500 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने त्यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात एक व रत्नागिरी तालुक्‍यात महिलांसाठी स्वतंत्र एक मिळून 10 प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यामध्ये एकूण 20 व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जातात. हे अभ्यासक्रम मशीन, नॉन मशीन तसेच अभियांत्रिकी विषयाशी संलग्न आहेत.

अभियांत्रिकी व मशीन संलग्न अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची विशेष पसंती आहे. दोन वर्षाचा अभ्यासक्रम सेमिस्टर पद्धतीने असतो. तो पूर्ण कल्यानंतर ऍप्रेंटिसशीप स्वरूपात संधी मिळते. मशीन, अभियांत्रिकीशी संलग्न अभ्यासक्रमांसाठी तर मोठमोठ्या कंपन्यांकडून कॅम्पस्‌ इंटरव्ह्यू आयोजित केले जातात. चांगली गुणवत्ता असणाऱ्यांना त्यात नोकरीची संधी चालून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यवसायिक अभ्यासक्रमांकडे कल आहे. 

आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ही 31 ऑगस्टपर्यंत सुरू असते आणि सप्टेंबरला प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू होतो, मात्र कोरोनामुळे यावर्षीची प्रक्रिया रखडली. आता ती सुरू झाली असून 31 डिसेंबरला पूर्ण होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली आहे. नवीन वर्षात अध्यापन सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्याबाबत कोणत्याही सूचना नाहीत. गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्‍चित केले जाणार आहेत. 

आवडीनुसार अभ्यासक्रम निवड

विद्यार्थी इलेक्‍ट्रीशियन, मोटार मेकॅनिक, एअर कंडिशन या अभ्याक्रमांना प्राधान्य देत आहेत. त्यानंतर फीटर, टर्नरकडे विद्यार्थी वळत आहेत. मशीन, अभियांत्रिकीशी संलग्न अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी हमखास असल्याने आवडीनुसार विद्यार्थी अभ्यासक्रमाची निवड करीत आहेत. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com