फणसाची बिर्याणी मोती तलाव महोत्सवात ठरली आकर्षण 

फणसाची बिर्याणी मोती तलाव महोत्सवात ठरली आकर्षण 

सावंतवाडी - कोकणातील फळसाधनातून स्वतःच्या कौशल्याने कसा रोजगार निर्माण करता येवू शकतो, याचे उत्तम उदाहरण येथील मोती तलाव उत्सवात फणसापासून बनविलेल्या बिर्याणीचे देता येईल. येथील अमरीन खान यांनी आपल्या कौशल्याने ही बिर्याणी बनवून सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी आपल्या घराजवळ असलेल्या फणसाची विल्हेवाट थांबवून त्याचा उपयोग बिर्याणीसाठी करुन रोजगार मिळवावा, असा कानमंत्रही त्यांनी दिला. 

घरासमोरील कुजून पडत असलेले फणसाचा उपयोग बिर्याणीसाठी होतो का, याबाबतची कल्पना आल्यावर आपण ती अमंलात आणण्यासाठी अनेकप्रयोग केले. त्यातून लोकांना आकर्षण असलेली बिर्याणी बनविण्यात आपणाला यश आले. फणसापासून चीफ, लाडू, कटलेट, फणसपोळी असे पदार्थ बनविले जातात. याच फणसाच्या माध्यमातून नुकतेच आईस्क्रीमही तयार करण्यात आले.

पर्यटकांना कोकणातील मेव्याचे तसेच फळपिकांचे मोठे आकर्षण नसते, एवढे आकर्षण त्यांना प्रक्रिया करुन बनविलेल्या विविध प्रकारच्या पदार्थ व खवय्यांचे असते. याचा विचार करुन फणसाच्या माध्यमातून बिर्याणीची कल्पना सूचली. येथील मोती तलाव महोत्सवात त्याला लोकांनी चांगलीच पसंती दिली. 

महोत्सवात मुंबईहून आलेल्या मुलांना फणस आवडत नव्हता; मात्र एकदा बिर्याणीची चव लागल्यावर त्यांनी पुन्हा ऑर्डर देऊन त्याची मागणी केली. आपण फणसाचा जसा रोजगारासाठी सदुपयोग केला आहे, तसा सदुपयोग लोकांनी करुन त्यांनी रोजगार मिळवावा. यासाठी इच्छा असणाऱ्यांना आपण मागदर्शन करायलाही तयार आहे, असे यावेळी खान यांनी सांगितले. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपणाला पती प्रा. हसन खान यांनी मोलाची साथ व प्रेरणा दिली. यापूर्वी आपण घरात कुटुंबियासाठी बिर्याणी केली होती.

लोकांनी आपल्या आजुबाजूस व परिसरात असलेल्या काजु, कोकम, आंबा, फणस, जांभळ व इतर कोकणी फळांवर प्रक्रिया करुन विविध प्रयोग करुन त्यातून आकर्षक व चविष्ट पदार्थ कसे बनविता येतील, याचा विचार करावा. फणसामध्ये अ जीवनसत्व असते तसेच मधुमेह, हृदयविकार, कर्करोग प्रतिकारक शक्ती, डोळ्याची दृष्टी स्पष्ट होण्याची क्षमता व त्वचेत उजळपणा अशा क्षमता असतात. याचे महत्व परदेशात मोठे आहे; मात्र येथील नागरीकांना त्याबाबत जागृती नाही. उन्हाळ्यात फणसाचे मोठे उत्पादन होते तसेच या हंगामात पर्यटकही येतात. 

""कोकणातील फळे कमी रुपयांत बाहेर निर्यात होतात. त्यावर बाहेरील कंपन्या प्रक्रिया करुन आपल्या जिल्ह्यात जास्त किंमतीत आयात होतात. त्यामुळे बाहेरच्या कंपन्याना येथील संसाधनाचे मोठे महत्व आहे. जिल्ह्यात प्रक्रिया करणारे उद्योग, कंपन्या व लघूउद्योगांना प्रोत्साहन मिळणे आवश्‍यक आहे.'' 
- प्रा. हसन खान 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com