केंद्रीय राज्य संरक्षित असलेल्या जयगड किल्ल्याचे बुरूज ढासळले; कारण अद्याप अस्पष्ट, प्रशासन खडबडून जागे

ऐतिहासिक वारशाबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
Jaigad Fort Towers
Jaigad Fort Towersesakal
Summary

जयगड किल्ल्याच्या बुरूजाला तडे गेल्यामुळे प्रशासन खडबडून जागे आहे. तत्काळ तहसीलदार म्हात्रे यांनी किल्ल्याला भेट दिली.

रत्नागिरी : तालुक्यातील जयगडमधील (Jaigad Fort) केंद्रीय राज्य संरक्षित असलेला जलदुर्ग किल्ल्याच्या बुरूजासह अनेक ठिकाणी ढासळला आहे. हा बुरूज नेमका कशामुळे ढासळत आहे, यासाठी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी किल्ल्याची पाहणी केली. तसा अहवाल ते जिल्हाधिकारी यांना सुपूर्द करणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

Jaigad Fort Towers
शाहू छत्रपती महाराजांना लोकसभेची उमेदवारी? शरद पवारांनी टाकली गुगली; म्हणाले, 'कोल्हापूरकरांची हीच भावना असेल तर..'

ऐतिहासिक वारशाबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला झाली; परंतु या वास्तूच्या दुरवस्थेबाबत कोणाला आठवणही झाली नाही, अशी खंत अनेक शिवप्रेमींनी केली.

प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असून, महाराष्ट्र राज्याची ही अनास्था आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जयगड किल्ल्याच्या बुरूजाला तडे गेल्यामुळे प्रशासन खडबडून जागे आहे. तत्काळ तहसीलदार म्हात्रे यांनी किल्ल्याला भेट दिली. पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांच्या या भेटीबद्दल जयगडच्या ग्रामपंचायत सदस्या देवयानी खाडे यांनी त्यांचे आभार मानले.

Jaigad Fort Towers
शेतजमिनीचा वाद टोकाला अन् गर्भवतीला झोळीतून न्यायची आली वेळ; मिरजेत माणुसकीला काळिमा फासणारी घटना

दरम्यान, खाडे यांनी एक खंत व्यक्त केली की, जर तहसीलदारांसह आम्हा ग्रामस्थांना आणि पुरातत्त्व खात्याचे तैनात कर्मचारी यांना सोबत घेऊन जर जयगड किल्ल्याच्या भेटीसंदर्भात सूचना दिली असती, तर कदाचित त्यांना मुख्य बुरूजाला तडे कुठून गेले, हे चांगल्याप्रकारे दाखवता आले असते. तहसीलदार म्हात्रे यांनी किल्ल्याची पाहणी केली; मात्र तडे गेलेली धोकादायक जागा पाहायचे राहून गेले, असे त्यांनी स्पष्ट केले. तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना हा पाहणी अहवाल सादर केल्यानंतर या विषयी जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेणार? याकडे जयगड ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Jaigad Fort Towers
Koyna Dam : कोयना धरणाच्या विमोचक दरवाजातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग; विद्युतनिर्मितीसाठी 1000 क्युसेकने वाढ

जयगड किल्ल्याची मी पाहणी केली. बुरूजासह अनेक ठिकाणी किल्ला ढासळला आहे. त्याबाबतचा अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे; परंतु कशामुळे ढासळला आहे, हे सांगू शकत नाही. पुरातत्त्व विभागाला याबाबत अवगत केले आहे.

-राजाराम म्हात्रे, रत्नागिरी तहसीलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com