Sindhudurg News : रखडलेली जलजीवन कामे आणि वाढते पाणी संकट! वैभव नाईक यांचा जिल्हा परिषदेला मोर्चाचा कडक इशारा
Vaibhav Naik Warns of Protest : जलजीवन मिशनची कामे चार वर्षांनंतरही रखडलेली; जिल्ह्यात ७१८ नळयोजना सुरू असूनही नवीन योजनांचे एकही काम पूर्ण न झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती.
सिंधुदुर्गनगरी : जलजीवन मिशनची कामे एक महिन्यात सुरू न झाल्यास जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला.