एक नव्हे दोन नव्हे तर दापोलीत सापडले तब्बल 'नानेटी' जातीचे सात साप

चंद्रकात जोशी
Friday, 28 August 2020

दापोली तालुक्यातील जालगाव कुंभारवाडीतील घटना...

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्यातील जालगाव कुंभारवाडी येथील शैलेश जालगावकर यांच्या घराजवळ एक नव्हे तर तब्बल सात साप आढळून आले मात्र ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत तत्काळ सर्पमित्र किशोर निवळकर यांना फोन केला व बोलवून घेतले, निवळकर यांनीही तात्काळ धाव घेत दापोली शहराजवळ जालगाव कुंभार वाडी येथे एक नव्हे तर तब्बल सात बिनविषारी सापांना जिवंत पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून त्यांना जीवदान दिले आहे.

अनेकजण साप म्हटले की ठार मारतात तो विषारी आहे की बिनविषारी आहे हे पहिले जात नाही, मात्र साप आढळून आल्यावर जर सर्पमित्रांना बोलावले तर ते तो साप पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडतात व त्याला जीवदान दिले जाते.

हेही वाचा- रत्नागिरीतील मृत्यूदर होईल कमी कसा वाचा

काल सापडलेले हे साप बिनविषारी असून त्यांचे नाव 'नानेटी' आहे. त्याचे खाद्य बेडुक सरडे, उंदीर, घुशी हे आहे म्हणूनच त्यांचा वावर घर परसावात असतो, आपल्याकडे नाग, फुरसे, मण्यार अशा विषारी साप आढळून येतात तर उर्वरित साप हे बिनविषारी असतात, हरणटोळ सारखे बिनविषारी साप झाडावर आढळून येतात त्यांचे भक्ष्य हे पक्षी व त्यांची अंडी हे असते अशी माहिती सर्पमित्र किशोर निवळकर यांनी दिली आहे. सर्पमित्र किरण करमरकर यांच्या टीममध्ये आपण सर्पमित्र म्हणून काम करत असल्याचे त्यानी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Jalgaon Kumbharwadi in Dapoli taluka found 7 snake