esakal | उल्लेखनीय! कणकवली तालुक्यात आता गोरगरिबांना मोठा आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Jan Arogya Yojana started at Kankavali Hospital

शस्त्रक्रिया येथे होणार नाहीत, त्यांच्यावर या योजनेत समावेश असलेल्या कोल्हापूर येथील नामवंत रूग्णालयातील डॉक्‍टरांकडे मोफत शस्त्रक्रिया करण्याची सोय केली जाणार आहे.

उल्लेखनीय! कणकवली तालुक्यात आता गोरगरिबांना मोठा आधार

sakal_logo
By
तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) - येथील उपजिल्हा रुग्णालयात पंतप्रधान जन आरोग्य सुविधा आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध 34 प्रकारच्या स्पेशालिटी आणि 1 हजार 221 प्रकारच्या आजारांचा समावेश असलेली सुविधा सुरू झाली आहे. याचा प्रारंभ आज रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. सहदेव पाटील यांच्या हस्ते झाला. 

कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ आणि मालवण तालुक्‍यातील रूग्ण येथे उपचारासाठी येतात. ग्रामीण भागातील रूग्णांसाठी या योजनेतून सर्जिकल व कॅन्सर, आर्थोपेडीक, न्यूरो सर्जरी, मणक्‍याचे विकार, किडनी, ह्रदयविकार, मेडिकल आयसीयु, सर्व प्रकाराचे गंभीर आजारावर उपचार होणार आहेत. रूग्ण श्‍त्रक्रियेसाठी कणकवलीसह ओरोस, कोल्हापूर येथीलही तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध होणार आहेत. ज्या शस्त्रक्रिया येथे होणार नाहीत, त्यांच्यावर या योजनेत समावेश असलेल्या कोल्हापूर येथील नामवंत रूग्णालयातील डॉक्‍टरांकडे मोफत शस्त्रक्रिया करण्याची सोय केली जाणार आहे.

गरीबांच्या दारापर्यंत योजना पोहोचविण्याचा संकल्प असून गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांनी केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या शुभारंभास रूग्णालयातील डॉ. सतीश टांक, डॉ. सी. एम. शिगलगार, डॉ. प्रियांका म्हसकर, डॉ. संतोष चौगुले, डॉ. सचिन व्ही. के., डॉ.अनिकेत किर्लोस्कर, डॉ. निनाद गायकवाड, डॉ. अनुप पळसंबकर, डॉ. धनेश म्हसकर, वरिष्ठ परिचारीका विजया उबाळे, श्रीमती पवार, श्रीमती परब, श्रीमती सावंत, मनोहर परब, श्री. चव्हाण आदी उपस्थित होते. 

योजनेबाबत डॉ. पाटील म्हणाले.... 
- पिवळ्या, केसरी कार्डधारकांशिवाय शुभ्र कार्डधारकांनाही लाभ 
- सरकारी कर्मचारी, शेतकरी, उद्योजक, माजी सैनिक, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही सेवा 
- सध्या स्पेशालिटी डॉक्‍टरांची सेवा येथे उपलब्ध 
- हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी स्वस्तीक हॉस्पिटल, आधार हॉस्पिटल, कोल्हापूर 

योजनेबाबत आवाहन 
या योजनेच्या लाभासाठी येताना रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड आवश्‍यक आहे. ही योजना राबविताना विशेष रुम, वार्डची रचना आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने मागणी केली आहे. सध्या डायलेसीस, आर्थोपेडीक, आयसीयु, ट्रामा केअर सुरू असून पुढील काही महिन्यात सीटी स्कॅन सेवाही सुरू होईल. त्यानुसार डॉक्‍टरांसाठी निवासस्थान, पाणी, ड्रेनेज सुविधाही पुर्णत्वास जाणे गरजेचे असल्याचे डॉ. पाटील म्हणाले. 

संपादन ः राहुल पाटील

loading image