व्हायरसला अजुन व्हायरल होण्यापासुन वाचवले ; जीवनासाठी या लढ्यात सहभाग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

जन्म मृत्यु अटळ असला तरी शुल्लक वाटणार्‍या विषाणुमुळे आपल्याला काहीतरी होईल या एकाच भावनेने व माझ्याकडुन इतर कुणाला ञास होवू नये या भावनेतुन आज माणुस घराबाहेर पडला नाही..

देवरुख (रत्नागिरी) : आजचा दिवस २२ मार्च२०२० हा लक्षात राहणारा आणि ऐतिहासिक दिवस ठरला..कोरोना व्हायरसचा मुकाबला करताना भारतीयांनी एकजुट दाखवुन व्हायरसला अजुन व्हायरल होण्यापासुन वाचवले.. एकजुट,सर्वधर्मसमभाव,एकोपा अशासारखे अनेक शब्द आज एकञ आले आणि बनला एकच तो म्हणजे माणुस..

जन्म मृत्यु अटळ असला तरी शुल्लक वाटणार्‍या विषाणुमुळे आपल्याला काहीतरी होईल या एकाच भावनेने व माझ्याकडुन इतर कुणाला ञास होवू नये या भावनेतुन आज माणुस घराबाहेर पडला नाही...यामुळे जीवनचक्रच थांबले,यंञांची धडधड थांबली,विमानांची पाती थांबली,वाहनांचे आवाज थांबले,ओकणारा धुर थांबला,सारे कसे शांत शांत झाले..पर्यावरणाला आज कमी धोका जाणवला.

हेही वाचा- Photo : इट्स केअर फॉर यु ; मंडणगडला उत्स्फूर्त प्रतिसाद...

सर्वांनी जीवनासाठी या लढ्यात घेतला सहभाग .

पशुपक्षांनाही याची जाणीव झाली असेल की मनुष्य प्राण्याचे काहीतरी आज बिघडले आहे ते...पृथ्वीतलावावर आजचा दिवस घड्याळ जरी सुरु असले तरी काटे थांबवणारा दिवस ठरला..आर्थिक गणिते  कोटीत बुडाली,काही रोजंदारीवरील  माणसे देशासाठी अर्धपोटी राहीली,काही बालकांना नव्या पिढीला आज दुधही मिळाले नसेल...तरीही सर्वांनी जीवनासाठी या लढ्यात सहभाग घेतला..स्वातंञ्यानंतरचा हा आपणच आपल्याशी संघर्ष करुन जिंकलेला धडा असणार आहे...पंतप्रधानांची एक हाक आणि विषाणुसाठी लढलेला प्रत्येक भारतीय आज बलवान ठरला..कोरोनावर हिच ताकद मात करणार आहे आणि या कोरोनाचा कायमस्वरुपी नायनाट होणार आहे...जय भारत
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: janta curfew impact in ratnagiri kokan marathi news