Indian Army : कराचीतून जहाजामधून आलो म्हणून वाचलो, अन्यथा मी..; 1946 मधील फाळणीच्या आठवणी जागवत जवानानं सांगितला थरार

१९४६ च्या शेवटी फाळणी होणार हे निश्चित झाल्यावर कराचीत दंगली सुरू झाल्या
Jawan Sudhakar Bendarkar
Jawan Sudhakar Bendarkaresakal

साखरपा : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी (Amritmahotsav) वर्षाची सांगता होत असताना फाळणीलाही ७५ वर्षे (Partition India Pakistan) पूर्ण होत आहेत. फाळणीच्या या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कराची इथे जन्मलेले आणि सैन्यातून निवृत्त झालेले हवालदार सुधाकर दामोदर बेंदरकर (Sudhakar Benderkar) यांनी त्या आठवणी जागवल्या.

हवालदार बेंदरकर हे मूळचे चिपळूणचे. पण आजोबा हे नोकरी निमित्त कराचीला स्थायिक झाले. ते कराची वेधशाळेत नोकरीला होते, तर वडील कराची पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे हवालदार सुधाकर बेंदरकर यांचा जन्म कराचीतच (Karachi) झाला.

Jawan Sudhakar Bendarkar
पांडुरंगानं वाचवलं! 'त्या' जिगरबाज सहा युवकांना सलाम; कारसह कालव्यात पडलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचे वाचवले प्राण

कराचीला लागून असलेल्या मनोरा बेटावर १९३३ ला त्यांचा जन्म झाला. १९४६ च्या शेवटी फाळणी होणार हे निश्चित झाल्यावर कराची आणि आसपासच्या ठिकाणी दंगली सुरू झाल्याचे बेंदरकर सांगतात. त्यामुळे वडिलांनी कराची सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला. आई-वडील आणि तीन मुलांसह बेंदरकर कुटुंबीय कराची हे बंदर असल्यामुळे जहाजाने निघाले.

Jawan Sudhakar Bendarkar
मोठी बातमी! दहशतवादाच्या संशयातून कोल्हापूर हिटलिस्टवर? 'एनआयए'चे तीन ठिकाणी छापे, देशात 5 राज्यांत कारवाई

समुद्रमार्गे येताना फारसा त्रास झाला नसल्याचे बेंदरकर सांगतात. कराची सोडताना बरोबर घेतलेल्या सामानात एक लाकडी पेटी बेंदरकर यांनी आणली होती. आजही ती त्यांच्या संग्रही आहे. त्या दंगलीत धर्मद्वेष्ट्या वातावरणातही आलेला सुखद अनुभव सुधाकर बेंदरकर यांनी सांगितला. मुंबईला बेंदरकर कुटुंब आल्यावर पुढे चिपळूणला येण्यासाठी त्यांना भाऊच्या धक्क्यावर यायचे होते.

पण, त्यावेळी सर्वत्र कलम १४४ लागू करण्यात आले असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. त्यामुळे कराचीहून मुंबई बंदरात उतरल्यावर सर्व सामान घेऊन भाऊच्या धक्क्यावर जायचे कसे, हा प्रश्न दामोदर बेंदरकर यांच्यासमोर असतानाच एक टांगेवाला तिथे आला. अर्थात तो परधर्माचा असल्यामुळे आणि सुरू असलेल्या धार्मिक दंगलीमुळे त्याचा टांगा वापरावा की नाही हा बेंदरकर यांच्यापुढे संभ्रम होता.

Jawan Sudhakar Bendarkar
NCP Crisis : अजित पवारांसोबत गेलेले लोक दु:खी, आमच्याकडून जे झालं ते चुकीचं झालं असं सांगताहेत; शरद पवारांचा गौप्यस्फोट

ही घालमेल टांगेवाल्याच्या लक्षात आल्यामुळे त्यानेच आपल्यावर विश्वास ठेवण्याची विनंती केली आणि त्यानेच बेंदरकर कुटुंबीयांना सामानासह सुखरूप भाऊच्या धक्क्यावर पोचवले.पण असे असले तरी सुधाकर बेंदरकर यांचे काका दत्तात्रय बेंदरकर हे त्यांच्या पत्नी आणि सासऱ्यांसह काही प्रवास ट्रेनने आणि नंतर चालत सीमा पार करून पाकिस्तानातून भारतात आले. पण त्यांना मात्र दंगलीचा अतोनात त्रास झाल्याचे सुधाकर बेंदरकर सांगतात.

या प्रवासात दत्तात्रय यांच्या सासऱ्‍यांचे निधन झाले. १९४७ साली पाकिस्तानातून निघालेले दत्तात्रय बेंदरकर आणि त्यांच्या पत्नीचा पुढे दोन वर्षे शोध लागला नाही. त्यांना बेपत्ता समजण्यात आले. पण १९४९ साली दिल्लीच्या निर्वासित छावणीत त्या दोघांचा शोध लागला. सुधाकर बेंदरकर हे सध्या त्यांच्या मुलीकडे भडकंबा इथे राहतात. देशाच्या विभाजनाच्या या आठवणी त्यांनी फाळणीच्या स्मृतिदिनी ‘सकाळ’साठी सांगितल्या.

Jawan Sudhakar Bendarkar
Loksabha Election : कोल्हापुरात काँग्रेसची मोठी खेळी! लोकसभेसाठी 'या' दिग्गज नेत्यांना उतरवणार रिंगणात?

दृष्‍टिक्षेपात

  • जन्म कराचीत

  • दोन पिढ्यांचे वास्तव्य सोडून कोकणात परत

  • समुद्र मार्गे आल्यामुळे जीव वाचला

  • काकांचे कुटुंब दोन वर्षे निर्वासीतांच्या छावणीत

  • कराचीहून आणलेली लाकडी पेटी आजही संग्रहित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com