पांडुरंगानं वाचवलं! 'त्या' जिगरबाज सहा युवकांना सलाम; कारसह कालव्यात पडलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचे वाचवले प्राण

युवकांनी आपल्या जिवाची तमा न करता कालव्यात उडी घेतली
Car Accident Dhom Balkawadi Canal
Car Accident Dhom Balkawadi Canalesakal
Summary

पुण्याहून डफळपूर या ठिकाणी निघालेले राहुल भाग्यवंत उबाळे (वय २५) व अविनाश भाग्यवंत उबाळे (वय २९) हे दोघे सख्खे बंधू लघुशंकेसाठी कालव्याजवळ थांबले होते.

खंडाळा : भरधाव मोटार लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला उडवून कालव्यात पडली. गाडीतील एकाच कुटुंबातील पाच जण गाडीसह सुमारे साडेतीनशे फूट वाहत चालले होते. या बिकटप्रसंगी परिसरातील चार युवकांनी आपल्या जिवाची तमा न करता कालव्यात उडी घेतली आणि सर्वांचे प्राण वाचविले.

ही थरारक घटना काल सकाळी पुणे- बंगळूर महामार्गावर (Pune-Bangalore Highway) खंबाटकी घाटाच्या (Khambatki Ghat) पायथ्याला घडली. जीवदान देणाऱ्या या युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत खंडाळा व महामार्ग पोलिसांनी सांगितले, की काल दुपारी पुण्याहून (घोरपडी) शिंदे कुटुंबातील सर्व जण आपल्या मूळगावी भडची (ता. अथणी, जि. बेळगाव) येथे आपल्या मोटारीतून (एमएच १२ टीवाय १०६६) निघाले होते.

Car Accident Dhom Balkawadi Canal
Satara Crime : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पवारांचा काढला काटा; गळा आवळून, हात-पाय बांधून मृतदेह फेकला कालव्‍यात

गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या धोम-बलकवडी प्रवाहित कालव्याच्या शेजारी लघुशंकेसाठी थांबलेल्या दुचाकीस्वाराला या चारचाकी वाहनाने उडवले व गाडी थेट पाण्यामध्ये पडली. गाडीत चालक श्रीपती श्रीमंत शिंदे (वय ४३), राजका श्रीपती शिंदे (वय ३७), संकेत श्रीपती शिंदे (वय १३), संस्कृती श्रीपती शिंदे (वय ८) व श्रीमंत श्रीपती शिंदे (वय ७२) असे पाच जण होते.

गाडी वाहत अंदाजे ३०० ते ३५० फूट आणि कालव्याला आडव्या असलेल्या लोखंडी पाइपला अडकून जागेवरच फिरली. गाडीमध्ये पाणी शिरू लागले. गाडीतील पाचही जण खूपच घाबरलेल्या अवस्थेत होते. वयस्कर आजोबा व दोन लहान मुले, तसेच महिलाही अस्वस्थ झाले होते.

Car Accident Dhom Balkawadi Canal
हृदय पिळवटून टाकणारी घटना! आजी, आजोबासह नातीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; घरात एकमेकांना चिकटून पडले होते मृतदेह

या बिकटप्रसंगी प्रसाद पांडुरंग गोळे (वय २१, रा. शिंद, ता. भोर) यांनी प्रथम कालव्यात उडी घेतली. यानंतर अजय संतोष पवार (वय २१, रा. सांगवी, ता. खंडाळा) यांनी पोहता येत नसतानाही पाण्यात उडी घेतली. अक्षय कांबळे (अजनूज), लक्ष्मण जगताप (वहागाव), सचिन माने (पारगाव) व पंकज लकडे (रा. नीरा, ता. बारामती) या युवकांनीही पाण्यात उडी मारून साखळी करून या पाचही जणांचे प्राण वाचविले.

भुईंज महामार्ग सहायक पोलिस निरीक्षक गालिंदे, मनोज पवार, कदम, विजय बागल व खंडाळा पोलिस राजू अहिरराव व इतर पोलिसांनीही तातडीने तेथे येऊन मदत केली. जखमींना येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

यातील दुचाकीस्वार राहुल भाग्यवंत उबाळे (वय २५, रा. डफळपूर, ता. जत) व श्रीमंत शिंदे गंभीर जखमी झाले आहेत. एक मुलगा संकेत शिंदे हा किरकोळ जखमी झाला आहे. इतर तीन जण सुखरूप आहेत. अपघातात चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद खंडाळा पोलिसांत झाली असून, राजू अहिरराव तपास करीत आहेत.

Car Accident Dhom Balkawadi Canal
Sangli Crime : दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राच्या वडिलांचा दगडाने ठेचून निर्घृण खून

दुचाकीस्वार उडाला कालव्याच्या पलीकडे

पुण्याहून डफळपूर या ठिकाणी निघालेले राहुल भाग्यवंत उबाळे (वय २५) व अविनाश भाग्यवंत उबाळे (वय २९) हे दोघे सख्खे बंधू लघुशंकेसाठी कालव्याजवळ थांबले होते. पाठीमागून आलेल्या मोटारीने राहुल उबाळे यांना एवढी जोराची धडक दिली, की ते कालव्याच्या पलीकडे ५० फुटांवर पडले. त्यांचे हेल्मेट पाण्यात पडले. ते गंभीर जखमी झाले आहेत.

Car Accident Dhom Balkawadi Canal
Kolhapur Crime : 'सुरेखाला हाक मारली, पण..'; उपसरपंचांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

देवा, पांडुरंगाने वाचवले..

या अतिशय बिकट प्रसंगातून वाचल्यानंतर चारचाकी मोटारीतील प्रवासी सौ. राजका शिंदे यांना हुंदके आवरत नव्हते. या युवकांच्या रूपात येऊन देवा पांडुरंगाने वाचवले. नाहीतर आज अख्खे कुटुंब गायब झाले असते, असे त्या म्हणाल्या. त्यांनी युवकांना व पोलिसांना धन्यवाद दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com