jellyfish anjarle sea beach
sakal
दापोली - दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी दापोली तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. समुद्रात अंघोळीसाठी उतरलेल्या सातारा येथील श्रेया गोरे (वय-१४) या मुलीला जेलीफिशचा स्पर्श झाल्याने त्वचेवर तीव्र खाज आणि जळजळ होण्याचा त्रास झाला. तिला तातडीने आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आले.