esakal | कणकवली : कोविड सेंटर बंद करून आरोग्याशी खेळ
sakal

बोलून बातमी शोधा

परशुराम उपरकर

कणकवली : कोविड सेंटर बंद करून आरोग्याशी खेळ

sakal_logo
By
तुषार सावंत -सकाळ वृत्तसेवा

कणकवली : राज्यात कोरोनाची तिसरी लाट य़ेणार असे सांगत सरकारने हिंदुच्या सणावर मर्यादा घातल्या आहे; मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर बंद करून त्यासाठी नेमलेला तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले जात आहे. लाट येणार असे सांगयाचे आणि कर्मचारी कमी करायचे, जिल्ह्यात गणेशोत्सव काळात जर ही लाट आली तर काय करणार, रेल्वे कर्माचारी जिल्हा सीमांवर कोरोना तपासणीत आहेत. मग ही लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन काय करणार ? पालकमंत्री, खासदार, आमदार गप्प राहून जनतेच्या आरोग्याशी खेळणार का ? असा सवाल मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: आम्हाला पुनर्नियुक्ती द्या : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी

येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. श्री. उपरकर म्हणाले, ``जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये खासगी पद्धतीने सेवा देणाऱ्या २७२ आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा थांबवण्यात आली आहे. आता तिसरी लाट येणार असल्याची एकीकडे सरकार सांगत आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढल्यास कोविड सेंटर बंद केल्यास उद्या रुग्णांना सेवा कशी मिळणार? आता सेवेतून डॉक्टर, आरोग्य सेविका, वार्ड बॉय यांना कमी करणाऱ्या ठाकरे सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का?``

हेही वाचा: यंदा गणेशोत्सवात सावंतवाडीतून मुंबईसाठी 12 बसेस

ते म्हणाले, "सरकारने त्या आरोग्य कर्मचाऱ्यांना किमान डिसेंबरपर्यत मुदतवाढ दिली पाहिजे होती. सरकारला तिसरी लाट येणार असे वाटत असेल तर त्यांचे नियोजन आताच केले पाहिजे. आता अतिरिक्त कर्मचारी कमी केल्यास ते कर्मचारी व डॉक्टर पाहता परत हे या सेवेत येतील का ? अनुभवी हे लोक मिळतील का ? याची चिंता आहे. ग्रामीण भागात कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी आणि फोटो काढणारे नेते बरेच होते. बरीचशी कोविड सेंटर उभी केली. आता ते साहित्य काय करणार ? त्यासाठी पुन्हा साहित्य घेणार का ? आता चाकरमानी येतील तेव्हा शासकीय आरोग्य कर्मचारी सर्व सीमा व रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये किती कर्मचारी राहणार याचा शासनाने विचार केला पाहिजे.

हेही वाचा: दापोली : बिबट्याची फासकीतून सुखरूप सुटका

त्यावेळी खासगी कर्मचारी उपयोगी पडतील. चाकरमानी मोठ्या संख्येने येणार आहेत. त्या चाकरमान्यांना आरटीसीआर तपासण्या करण्याचा भुर्दंड घातला आहे. गावात चाकरमानी आल्यानंतर कोरोना वाढेल असे आरोग्य अधिकारी सांगत आहेत. दुसऱ्या लाटेत जिल्हात १३०० लोकांचे जीव गेले. आता जिल्हातील जनतेचे कोरोनाने जीव जाण्याची वाट सरकार पाहत आहे का ? कोरोना काळात हंगामी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, यासाठी मनसे आरोग्य मंत्री व आरोग्य सचालकांना पत्र देणार आहे. पुन्हा कोविड सेंटर चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी श्री. उपरकर यांनी केली आहे.

loading image
go to top