कणकवली : यांत्रिकी मासेमारीमुळे कासवांना धोका

यांत्रिक मासेमारीमुळे समुद्रातील कासवांचे अस्तित्‍व धोक्‍यात येऊ लागले आहे
 hinder fishing
hinder fishing sakal

कणकवली: कोकणची किनारपट्टी कमी प्रदूषित असल्‍याने जगभरातील विविध कासवांच्या जाती अंडी देण्यासाठी येथील समुद्र किनाऱ्यांवर येतात. या कासवांच्या अंड्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्‍न सुरू झाले आहेत; मात्र यांत्रिक मासेमारीमुळे समुद्रातील कासवांचे अस्तित्‍व धोक्‍यात येऊ लागले आहे, अशी खंत प्रा. नागेश दप्तरदार यांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरकुळ बुद्रुक येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मानव आणी प्राणी यांमधील संघर्षाबाबत लोकांना जागृत करण्यासाठी ‘समुद्र कासवांचे संरक्षण व संवर्धन’ या विषयावर व्याख्यान झाले. यात कासव संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रा. दप्तरदार यांनी मार्गदर्शन केले.

दप्तरदार म्‍हणाले, ‘नैसर्गिक व मानवनिर्मित धोक्यापासून कासवाची अंडी व पिल्ले संवर्धित करण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चालू आहे, ‘कासव संवर्धन व संगोपन’ या बाबत आम्‍ही सातत्‍याने प्रशिक्षण शिबिर घेत आहोत. यात सर्वांनी सहभागी होऊन कासव संवर्धन व संगोपन

या करीता मोलाचा वाटा उचलावा. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिश गांगल, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. एस टी माने व प्रा. अरविंद कुडतरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. एस टी माने यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक चिंतामणी खैर यांनी केले. प्रियांका सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

अनेक जातींचा ऱ्हास होण्याची भीती

दप्तरदार म्‍हणाले, ‘आॅलिव्ह रीडले, हावक्स बील, ग्रीन टर्टल, लेदर बँक जायंट टर्टल अशा अनेक कासवांच्या प्रजाती वेंगुर्ला, मालवण, देवगड या किनारपट्टीवर आढळतात; मात्र यांत्रिक मासेमारी आणि कासवाच्या अंड्यांची शिकार केली जात आहे. याखेरीज पाठीवरील कवचासाठीही समुद्रातील कासव पकडले जात आहेत. यात कासवाच्या अनेक जाती ऱ्हास पावत आहेत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com