Kankavli News:'ती' बातमी छापणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी दिल्‍याप्रकरणी कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयातील एका डॉक्‍टर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Kankavli News:'ती' बातमी छापणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
Published on

Kankavli News: पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी दिल्‍याप्रकरणी कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयातील एका डॉक्‍टर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पत्रकार भगवान सुरेश लोके यांनी काल (ता.२३) रात्री उशिरा फिर्याद दिली. त्‍यानंतर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत डॉक्‍टर विरोधात कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत.


कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात गर्भवती मातांवर योग्‍य उपचार होत नसल्‍याच्या अनुषंगाने पत्रकार भगवान लोके यांनी आपल्‍या माध्यमातून बातमी प्रसारीत केली होती. ही बातमी दिल्‍याने आपली बदनामी झाल्‍याचा आरोप उपजिल्‍हा रूग्‍णालयातील त्या डॉक्‍टरने केला तसेच श्री. लोके यांच्या मोबाईलवर फोन करून धमकी दिली.

त्‍याचबरोबर श्री. लोके यांच्या विरोधात बदनामी केल्‍याच्या आरोपाखाली पोलिसांत तक्रारही दाखल केली. त्‍या डॉक्‍टरकडून मारण्याची धमकी दिल्‍यानंतर श्री. लोके यांनी, आपल्‍या जीवितास त्‍या डॉक्‍टरकडून धोका असल्‍याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीनंतर कणकवली पोलिसांनी त्‍या डॉक्‍टरविरोधात महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्थेच्या कलमांअन्वये गुन्हा दाखल केला आहे. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

Kankavli News:'ती' बातमी छापणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
Maratha Reservation : तुषार दोशींची तीनच दिवसांत पुन्हा बदली; मिळाली 'ही' जबाबदारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com