रत्नागिरी हापूसच्या नावाखाली राजरोस कर्नाटकी आंब्याची विक्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

रत्नागिरी - जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा आदेश असताना रत्नागिरी हापूसच्या नावाखाली राजरोस कर्नाटकी आंब्याची रत्नागिरी शहर आणि परिसरात विक्री सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच यावरून बाजारपेठेत वाद झाला. चंपक मैदान, एमआयडीसी, बाजार समितीचाही मिक्‍सिंगसाठी वापर होत आहे. यामुळे रत्नागिरी हापूस बदनाम होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

रत्नागिरी - जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा आदेश असताना रत्नागिरी हापूसच्या नावाखाली राजरोस कर्नाटकी आंब्याची रत्नागिरी शहर आणि परिसरात विक्री सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच यावरून बाजारपेठेत वाद झाला. चंपक मैदान, एमआयडीसी, बाजार समितीचाही मिक्‍सिंगसाठी वापर होत आहे. यामुळे रत्नागिरी हापूस बदनाम होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

रत्नागिरी हापूसला प्रचंड मागणी आहे. ग्राहक चार पैसे जादा देऊन रत्नागिरी हापूस खरेदी करतो. चोखंदळ ग्राहकांना फळांचा राजा हापूस हवा आहे. पर्यटक खास हापूस खरेदीसाठी रत्नागिरीत येत आहेत. त्याचा फायदा मोजके स्थानिक व्यापारी घेत आहेत. त्यांच्या मदतीने कर्नाटकी आंबा रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात येत आहे.

काही व्यापाऱ्यांनी घेतलेल्या त्या गाळ्यांमध्ये रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकी आंबा मिसळला जात असल्याची चर्चा आहे. हे गाळे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतलेले नाहीत ना याची खातरजनमा करण्याची मागणी आहे. गाळ्यातून विक्रीसाठी लिलावाद्वारे आंबा बाहेर येतो. तसेच एमआयडीसी, चंपक मैदान आदी भागात रत्नागिरीत हापूसमध्ये कर्नाटकी आंबा मिसळून तो शहरात विक्री केला जात असल्याचा दावा काही स्थानिक आंबा बागायतदार आणि व्यापाऱ्यांनी केला आहे.   
हापूस नावाचा वापर करून अन्य राज्यातून येणाऱ्या आंब्याची विक्री रोखण्यासाठी कारवाई करा. प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तरी शहरामध्ये आंब्याचा असा बाजार सुरू आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत यावरूनच काही स्टॉलधारकांमध्ये वाद झाला होता. स्थानिक राजकीय पुढारीही त्यामध्ये होते. यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने मोजक्‍या व्यापाऱ्यांचे फावले आहे. 

कॅनिंगचा भाव ११ रुपयाने घसरला
कॅनिंगच्या आंब्याला रत्नागिरीत किलोमागे २७ रुपये भाव मिळत होता. मात्र, कर्नाटकी आंब्याचे मोठमोठे लोड रात्री रत्नागिरीत दाखल होत आहेत. त्यामुळे किलोचा कॅनिंगचाही दर घसरून १७ रुपयावर आला आहे. 

आपलेच दात आपलेच ओठ
आपलेच दात आणि आपलेच ओठ, अशी परिस्थिती आहे. काही स्थानिक व्यापारी कर्नाटकी आंबा आणण्यात सामील असल्याचे बोलले जाते. त्यांच्याविरुद्ध बोलून वाईटपणा घेण्यास कोणी तयार नसल्याने कोणी प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karantaka mango sale on name of Ratnagiri Hapus