चिपळूण : स्थानिक बाजारपेठेत हापूस आंब्याच्या (Hapus Mango) नावाखाली कर्नाटकी आंब्याची (Karnataka Mango) विक्री सुरू झालेली आहे. कर्नाटकी आंबा कमी दरात विकला जात आहे. त्यामुळे हापूस आंब्याचे दरही उतरले आहेत. त्यामुळे बागायतरांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.