दोन तासांच्या थरारानतंर दोनशे फुट खोल दरीतुन श्रीकांतला बाहेर काढण्यात आले यश

एकनाथ पवार
Monday, 26 October 2020

श्रीकांतच्या अंगावर दगड माती पडली होती.पाय आणि हाताला मोठी दुखापत झालेला चालक प्रचंड व्हीवळत होता.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : करूळ घाटात रविवारी ता.२६ सांयकांळी चार वाजता दोनशे फुट खोल दरीत ट्रक कोसळला.या अपघातात ट्रक चालक श्रीकांत शशिकांत बिकट वय-५० हा गंभीर जखमी होऊन दरीत अडकला होता.यावेळी घटनास्थळी आलेले पोलीस आणि जीवरक्षक संस्थेच्या कार्यकर्त्यानी दोन तासांच्या अथक परिश्रमानतंर त्याला सुरक्षित बाहेर काढले.त्यानतंर चालकाला अधिक उपचाराकरीता कोल्हापुरला हलविण्यात आले.

कोल्हापुरहुन गोव्याकडे मैदा घेवुन निघालेला ट्रक(क्रमांक एमएच-०९,बीए-८००१,) चार वाजण्याच्या सुमारास करूळ घाट उतरत होता.गगनबावड्यापासुन तीन किलोमीटर घाट उतरल्यानतंर चालक श्रीकांत बिकट (रा.कणेरीवाडी,कौलकनगर,कोल्हापुर,)यांचा गाडीवरील ताबा सुटला.गाडीवरील ताबा सुटल्यामुळे किल्नर धनराज श्रीमंत राऊत, वय-२२,(रा.लातुर सध्या रा.कोल्हापुर) याने गाडीतुन उडी मारली.त्याचवेळी ट्रक सरक्षंक कटडा तोडुन दरीत कोसळला.हा ट्रक सुमारे दोनशे फुट खोल दरीत जावुन थांबला.या भीषण अपघाताची माहीती मिळताच करूळ तपासणी नाक्यावर असलेले पोलीस कर्मचारी संदीप राठोड हे घटनास्थळी पोहोचले.त्यांनी ही माहीती पोलीस स्थानकात दिली.

अपघातस्थळी असलेल्या क्लिनरकडुन त्यांना ट्रकसोबत ट्रक चालक दरी कोसळले असल्याची माहीती मिळाली.श्री.राठोड यांनी तत्काळ त्याला बाहेर काढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या.घाटरस्त्यावरून जाणारा एक टेम्पो थांबवुन त्याच्याकडुन लांबलचक दोरी घेतली.ही दोरी रस्त्याकडेच्या पाईपाला बांधुन स्वतः श्री.राठोड सुरूवातीला दोरीच्या सहाय्याने दरीत उतरले.दरी गेल्यानतंर त्यांना भयावह चित्र पाहायला मिळाले.चालक श्रीकांतच्या अंगावर दगड माती पडली होती.पाय आणि हाताला मोठी दुखापत झालेला चालक प्रचंड व्हीवळत होता.श्री.राठोड यांनी चालकांच्या अंगावरील दगड अलगद बाजुला करीत चालकाला धीर देण्याचा प्रयत्न केला.

ही माहीती मिळाल्यानतंर पोलीस निरीक्षक अतुल जाधव,मारूती साखरे,एम.के.सोनटक्के,,सह्यद्री जीवरक्षक संस्थेचे हेमंत पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले.तोपर्यत पोलीस कर्मचारी श्री.राठोड यांनी क्लिनरच्या मदतीने चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते.एका चादरीत लपेटुन ते चालकाला बाहेर काढत होते.त्यानतंर सहयाद्री जीवरक्षकही मदत कार्यात उतरले. अतिशय धोकादायक ठिकाणी ट्रक कोसळल्यामुळे जखमीला बाहेर काढताना सर्वाना तारेवरची कसरत करावी लागत होती.अखेर दोन तासांच्या थरारानतंर चालक श्रीकांत याला बाहेर काढण्यात यश आले.

हेही वाचा- इचलकरंजीत सामाजिक कार्यकर्त्याने पालिकेसमोरच घेतले पेटवून

तत्पुर्वीच रूग्णवाहीका बोलविण्यात आली होती.रूग्णवाहीकेतुन चालकाला उपचाराकरीता कोल्हापुरला हलविण्यात आले.चालकाच्या उजवा पाय आणि उजवा हाताला गंभीर दुखापत झाली आहे.दोनशे फुट खोल दरीतुन चालकाला सहीसलामत बाहेर काढण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणारे पोलीस कर्मचारी संदीप राठोड यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आणखी एका चालकांचा वाचविला होता जीव

वर्षभरापुवी करूळ घाटाचा सरक्षंक कटडा तोडुन एक ट्रक दरीत अडकला होता.चालकाची कॅबिन दरीत आणि ट्रक कटड्यावर अशा स्थितीत ट्रक होता.ट्रकचालक ट्रकमध्येच अडकुन होता.यावेळी पोलीस कर्मचारी संदीप राठोड याने दुसऱ्या एका ट्रकमधुन लाकडी फळी घेवुन त्यावरून ट्रकचालकाला सुरक्षित बाहेर काढले होते.आता दुसऱ्यांदा त्याने एका ट्रक चालकाचा जीव वाचविण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karul ghat accident case in sindhudurg pulled out of a 200 foot deep ravine