esakal | Khed : दिल्लीला महाराष्ट्र कळत नाही
sakal

बोलून बातमी शोधा

khed

Khed : दिल्लीला महाराष्ट्र कळत नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड : दिल्लीला महाराष्ट्र कळत नाही. त्यामुळेच ज्ञानपीठ पुरस्कार हा दाक्षिणात्य साहित्यिकांना दिला जातो. एकाच कर्नाटकातील साहित्यिकांना ९ ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार देणाऱ्या राष्ट्रीय कमिटीला थोडा आकस असू शकतो. मात्र, आपणही कमी पडतो ही वस्तुस्थिती आहे, अशी खंत मधू मंगेश कर्णिक यांनी बोलून दाखवली अशी माहिती गजानन पाटील यांनी दिली.

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून दिला जाणारा जनस्थान पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, कवी मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना कर्णिक यांनी ही खंत व्यक्त केली. कर्णिक म्हणाले, दक्षिणेतील साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कारासाठी लॉबिंग करतात असं मी म्हणत नाही.

मात्र, साहित्य अनुवादामध्ये आपण कमी पडतो. राज्यातील साहित्यिकांचे साहित्य इतर भाषेत अनुवाद करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केली आहे. राज्यात मराठी विषयी बोलणारे खूप वक्ते निर्माण झाले; परंतु आजही मराठीच्या संवर्धनासाठी, विकासासाठी कोणीही प्रयत्न करतांना दिसत नाही. मराठीच्या संवर्धनासाठी उदासीन आहे.दुसरीकडे कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये प्रतिष्ठानचा अजिबात हस्तक्षेप नसतो. म्हणून हा पुरस्कार साहित्य क्षेत्रात मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. हा पुरस्कार मला मिळाला म्हणून आनंद झाला.

दडपणही टाकलं जातं

देशातील सर्व भाषिकांचे भाषाभवन मुंबईत आहे पण, मराठी भाषाभवन अजून होऊ शकले नाही ही शोकांतिका आहे. याबाबत आजवरच्या अनेक सांस्कृतिक मत्र्यांकडे पाठपुरावा करूनही शासनाची उदासीनताच दिसून आल्याचे सांगून ते म्हणाले, शासन कोणाचेही असो मराठीचा आदर सर्वजण व्यक्त करतात. परंतु, प्रत्यक्षात कोणतेही शासन काहीच करत नाही. मराठीसाठी बोलणारे अनेक वक्ते तयार झाले; परंतु मराठीच्या जतनासाठी कोणीही प्रयत्न करतांना दिसत नाही सांगून ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये अनेक जणांचे फोन, पत्र येतात. तसेच दडपणही टाकले जाते.

loading image
go to top