bamboo pit viper snake rescue in Khed
esakal
खेड : खेड शहरातील महात्मा फुले नगर येथील वस्तीत ‘बांबू पिट व्हायपर’ म्हणजेच ‘चापर किंवा चापडा’ जातीचा अत्यंत विषारी आणि दुर्मिळ साप आढळून आला. स्थानिक रहिवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखत वन्यजीव रक्षकांना माहिती दिल्याने या सापाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश (Rare Venomous Snake) आले. घनदाट जंगलात आढळणारा हा साप मानवीवस्तीत आढळल्याने सर्पमित्रांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.