खेड : मनसे सरचिटणीस वैभव खेडेकरांना धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 वैभव खेडेकरा

खेड : मनसे सरचिटणीस वैभव खेडेकरांना धमकी

खेड: ‘मी भारतात आलो की बघून घेतो, तुझ्या घरात येतो, तू पळून जाऊ नकोस,’ अशा स्वरूपाची धमकी परदेशातील अज्ञाताने फोनवरून दिली, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी पत्रकारांना दिली. मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे हा फोन आल्याचा दावा खेडेकर यांनी केला. बुधवारी रात्री १०.३० वा. धमकीचा फोन आल्याची माहितीही खेडेकर यांनी दिली. वैभव खेडेकर यांना परदेशातून आलेल्या फोनचे संपूर्ण रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार बुधवारी (ता.४) कोकणात विविध ठिकाणी महाआरतीचे आयोजन केले होते. त्यानंतर हा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपल्याला मी भारतात आलो की बघून घेतो, तुझ्या घरात येतो, तू पळून जाऊ नको, अशा स्वरूपाची धमकी दिलेली आहे. त्या वेळी मी सदर व्यक्तीला आमच्या पक्षाच्या भूमिकेविषयी हिंदू-मुस्लिम सलोख्याविषयी समजवण्याचा प्रयत्न केला; परंतु संबंधित व्यक्ती ऐकण्याच्या मनःस्थितीत दिसून येत नव्हती. या धमकीमुळे माझे व माझ्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका पोहोचवण्याचा धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा हेतू स्पष्ट होत आहे. या संबंधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी आपण पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केल्याचे खेडेकर यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या या आंदोलनामुळेच धमकी देणारा फोन आल्याचा दावा त्यांनी केला.

वैभव खेडेकर यांना परदेशातून आलेल्या फोनचे संपूर्ण रेकॉर्डिंग सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले असून, यामध्ये खेडेकर यांनी शेवटपर्यंत सामंजस्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते; मात्र परदेशात बसून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने शेवटपर्यंत स्वतःची ओळख खेडेकर यांना दिली नाही. फोनवर दिलेल्या धमकीनंतर मनसेचे वैभव खेडेकर यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या वेळी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या माथेफिरूवर कठोर कारवाईची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Khed Mns General Secretary Vaibhav Threatens Khedekar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top