
Khemwadi Village
Sakal
पाली : या आधुनिक जगामध्ये प्रत्येक गोष्टीला किंमत आहे. एखादी वीट सुद्धा कोणी कोणाला फुकट देत नाही. मात्र सुधागड तालुक्यातील खेमवाडी येथील खताळ कुटुंबीयांच्या वारसांनी आपल्या पूर्वजांचे राहते घर येथील खेमजाई नवतरून मित्र मंडळ खेमवाडी या मंडळाला दान करत अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. गावाकऱ्यांना आता विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे.