Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

Raigad Breaking : कार, रिक्षा, दुचाकींचा चक्काचूर; ६ जण जखमी, चालक पोलिसांच्या ताब्यात; शिळफाटा परिसरात मोठा गोंधळ!
One youth dies as bus rams into vehicles for half a kilometer.

One youth dies as bus rams into vehicles for half a kilometer.

Sakal

Updated on: 

खोपोली (रायगड) : रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातून एक अत्यंत भीषण आणि थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली आहे. खोपोलीतील गजबजलेल्या शिळफाटा बाजारपेठ परिसरात एका बेदरकार खाजगी बसने सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत अक्षरशः मृत्यूचा थरार घडवला. चालकाचे नियंत्रण सुटलेली ही बस समोर येईल त्या वाहनांना धडक देत पुढे धावत राहिली. या विचित्र आणि भीषण साखळी अपघातात अनेक दुचाकी, कार, जीप आणि रिक्षांचा चक्काचूर झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. दुर्दैवाने, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...