आंबोली घाटातील अपहरण, दरोडा प्रकरणाचा छडा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 June 2019

सावंतवाडी - आंबोली येथील अपहरण व दरोडा प्रकरणात पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनातील एक संशयित फरार आहे. आज अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हातकणंगले येथील व्यापारी उमेश पिसे हे गोव्याहून कोल्हापूरकडे जाताना अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली.  त्यांच्याकडील 1 लाख 90 हजार रूपये रोख आणि 12 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. तसेच पिसे यांचे अपहरण करून नंतर त्यांना बेळगांव येथे सोडले होते. अपहरण करणारे  सर्वजण तरुण आहेत. 

या दरोड्याचा तपास करून पाच आरोपींना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यानी दिली.  यातील फरारी असलेला एक संशयित पोलिसात असल्याचे समजते. याचा तपास अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक निमित गोयल, स्थानिक गुन्हा अन्वेषण चे निरीक्षक प्रल्हाद पाटील, सावंतवाड़ी पोलीस निरीक्षक धनावडे हे करत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidnapping, robbery case in Amboli Ghat follow up