
राजापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन संदर्भातील अडीअडचणी आणि समस्यांसह सीआरएफ फंडातून पुलाची कामे प्रस्तावित करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेवेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तत्काळ मार्ग काढू आणि लोकांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन आमदार सामंत यांना दिले.