esakal | कणकवलीत राणेंच्या ईडीचा व्हिडिओ डिस्प्ले; सोमय्या विरुद्ध शिवसेना आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना आक्रमक

कणकवलीत किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना आक्रमक

sakal_logo
By
- तुषार सावंत

कणकवली : संवेदनशील असलेल्या कणकवलीत आज पुन्हा एकदा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. कणकवलीच्या श्रीधर नाईक चौकातील शिवसेना शाखे बाहेर सोमय्या यांची दोन वर्षापूर्वी नारायण राणेंवरील ईडीच्या मागणीचा व्हिडिओ डिस्प्ले लावण्यात आला आहे. त्यातच सोमय्या यांचे या चौकात दुपारी स्वागत झाल्यानंतर तणावाचे वातावरण होते. मात्र पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात ठेवल्याने तूर्तास हा वाद शमला आहे.

सोमय्या हे कोणत्या विषयावर बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. संपूर्ण देशामध्ये संनचयी इन्व्हेस्टमेंट हे प्रकरण गेल्या काही वर्षांत गाजले होते. हे प्रकरण पुन्हा एकदा बाहेर काढण्याचे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची थकित रक्कम परत मिळवून देण्याच्या नावाखाली सोमय्या यांना विशेष बोलविण्यात आली आहे.

हेही वाचा: खवलेमांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद; धोपावेतील प्रकार

आज येथे संजीवनी गुंतवणूकदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर सोमय्या संचयनी प्रकरण व अन्य काही प्रकरणांबाबत पुन्हा एकदा माध्यमांसमोर येणार आहे. याचे नियोजन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून झाले आहे. आज दुपारी सोमय्या आल्यानंतर शिवसेनेनेही तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना शाखे बाहेर डिस्प्लेवर सोमय्या यांचे नारायण राणे कुटुंबावरील यापूर्वी केलेले आरोप थेटपणे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे तणावपूर्ण वातावरण होते. सोमय्या यापूर्वी केलेल्या आरोपातील प्रथम उत्तर सिंधुदुर्ग जनतेला द्यावी असे आवाहन शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

loading image
go to top