esakal | काजूचे रिंगण आहे तरी काय ?
sakal

बोलून बातमी शोधा

Know About Cashew Nut Round Game Sindhudurg Marathi News

या खेळात नंबर पाडण्याचीही एक वेगळीच पद्धत होती. नेम लावून एकच काजू अचूक उडविण्यासाठी शोधून ठेवलेला मोठा काजू म्हणजे कोकणी भाषेत डप म्हणायचे.

काजूचे रिंगण आहे तरी काय ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदगाव ( सिंधुदुर्ग ) - सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच घरी आहेत. सध्या कोकणात काजू पिकाचा हंगाम सुरू असल्याने अनेक जण काजू बागेत दिसून येतात; मात्र याच हंगामात काही वर्षांपूर्वी काजूची रिंगण लावून खेळला जाणारा खेळ पाहायला मिळत नाही. कदाचित अनेक मुलांना हा खेळ माहीतही नसावा; मात्र या गमतीदार आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळत आहे. 

दुपारचे जेवण कधी जेवतो आणि कधी एकदा काजूच्या रिंगणाचा खेळ खेळायला पोचतो याकडे अनेकांचे लक्ष असायचे. याखेळात लहानच नाही तर मोठे पुरुषही सक्रिय असायचे. जेवन होताच लहानगे आपल्याच झाडांचे काजू चोरून खीसे भरून खेळाच्या मैदानात पसार व्हायचे. मोठ्यांचा वेगळा आणि छोट्यांचा वेगळा असे दोन मांड (रिंगण) भरले जायच्‌े आणि खेळ सुरू व्हायचा. त्याअगोदर काजू तपासून घेतले जायचे. नाहीतर काहीजण घरच्यांनी टाकून दिलेल्या फोक्‍या (खराब) काजू घेऊन खेळायला यायचे आणि वादावादी सुरू व्हायची. 

या खेळात नंबर पाडण्याचीही एक वेगळीच पद्धत होती. नेम लावून एकच काजू अचूक उडविण्यासाठी शोधून ठेवलेला मोठा काजू म्हणजे कोकणी भाषेत डप म्हणायचे. आताच्या भाषेत कदाचित त्याला कींग म्हटले असते असा शोधून काढलेला तो डप ठराविक ठिकाणी पाडलेल्या रेषेपुढे प्रत्येकाने टाकायचा आणि कमी अंतरावर डप असेल तो पहिला असे नंबर व्हायचे. 

रिंगण लावण्यासाठी प्रत्येकी दोन काजू घेऊन डाव भरून मांड सजायचा आणि ठराविक अंतरावरून अनुक्रमे डपाने रिंगणातील एकच काजू अचूक उडविण्यासाठी निशानेबाज सुरू व्हायची. प्रत्येकी एक चान्स शिवाय हा निशाणा साधत असताना चूकून एक किंवा अधिक काजू जर उडाली तर त्याला या खेळाच्या भाषेत फगडा असे म्हणत इतर खेळाडू जल्लोष करत आणि त्या खेळाडूला चार काजूचा दंड त्या रिंगणात भरावा लागायचा. 

एकामागून एक आपापल्या परीने प्रयत्न करतानाच कुणी एकजण अचूक काजू उडविताच सर्व शांतता तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावेनासा व्हायचा; मात्र त्यांच्या मागील नंबरवाल्यांसाठी एक संधी असायची ती म्हणजे भागीदारी. हि भागीदारी मिळविणे म्हणजेही मोठे कौशल्य असायचे. ज्याने अचूक निशाणा साधलाय त्याचा डपाला अचूक टिपल्यास टिपणारा रिंगणातील अर्ध्या काजूचा भागिदार शिवाय टिपणारे वाढले की त्यापध्दतीत काजूची वाटणी असा हा खेळ ऐन उन्हाळ्यात आणि भर उन्हात किंवा मोठ्या झाडांच्या सावलीत सुरू असायचा. 

loading image