esakal | रत्नागिरीत ५ पोलिस निरीक्षक, ८ सपोनिंची नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

 kokan Appointment of 5 police inspectors 8 salons

जिल्हा पोलिस दल; शाह स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक, चौधरींना ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार

रत्नागिरीत ५ पोलिस निरीक्षक, ८ सपोनिंची नियुक्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलातील पाच पोलिस निरीक्षक व आठ सहायक पोलिस निरीक्षकांना जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी नवीन नियुक्‍त्या दिल्या आहेत. यामध्ये विनीत चौधरी यांची नियुक्ती ग्रामीण पोलिस ठाणे, शिरीष सासणे यांना वाहतूक शाखा तर हेमंतकुमार शाह यांना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे. 
 

जिल्हा पोलिस दलातील अनेक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या काही दिवसांपूर्वी झाल्या होत्या. त्यांच्या बदल्यात आलेल्या अधिकाऱ्यांना नियुक्‍त्या दिल्या नव्हत्या. दिवाळीच्या पूर्वसंध्येला या अधिकाऱ्यांना नियुक्‍या दिल्या. बदलीने जिल्ह्यात दाखल झालेल्या आणि जिल्ह्यात बदलीपात्र पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी केल्या. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रत्नागिरीत बदलीने आलेले निरीक्षक विनीत चौधरी यांना ग्रामीण पोलिस ठाण्यात नियुक्ती दिली. संजय आंब्रे यांची बदली नियंत्रण कक्षातून पोलिस कल्याण शाखेत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिरीष सासणे यांची बदली जिल्हा वाहतूक शाखेत, अनिल गंभीर यांची लांजा पोलिस ठाणे, आस्थापना शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार शाह यांची बदली स्थानिक गुन्हे शाखेत केली आहे. पाच पोलिस निरीक्षकांसह आठ सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या झाल्या. 

हेही वाचा- ऋषीकेशच्या जीवनाची आता सुरुवात झाली होती म्हणत वडीलांच्या भावनांचा फुटला बांध -

विनीत चौधरी : ग्रामीण पोलिस ठाणे
 शिरीष सासणे : जिल्हा वाहतूक शाखा
 नितीन ढेरे : जयगड पोलिस ठाणे 
सागरी सुरक्षा : जगदीश केळकर 


आठ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये नितीन ढेरे यांना जयगड पोलिस ठाणे, तुषार पाचपुते वाचक शाखा, जगदीश केळकर सागरी सुरक्षा, शहाजी पवार मंडणगड पोलिस ठाणे, गणेश सावर्डेकर दाभोळ पोलिस ठाणे, प्रकाश बाईंग देवरूख पोलिस ठाणे, नजीब इनामदार खेड पोलिस ठाणे, संदीप वांगणेकर यांची रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

संपादन- अर्चना बनगे