
Latest Maharashtra News: मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पेण तालुक्याची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून येथे असणाऱ्या डोंगराळ भागातील आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर असून येथे असणारे उपजिल्हा रुग्णालय सध्या ५० खाटांचे आहे त्यामुळे येथे डॉक्टरांसह इतर गोष्टींची कमतरता सातत्याने भासत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब आदिवासी रुग्णांना अलिबाग अथवा पनवेल, मुंबई येथे हलवावे लागत आहे.
त्यामुळे अधिक उपचाराकरिता जात असताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असल्याने याचा विचार राज्य शासनाने करून गोरगरिबांच्या आरोग्याकरिता पेण उपजिल्हा रुग्णालयाची व्याप्ती वाढवून येथे १०० खाटांचे रुग्णालय बांधावे मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी केली